BJP aggressive over Congress Vijay Wadettiwar controversial statement on Pahalgam victims
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्म विचारण्याबाबत संशय व्यक्त केला आहे. यावरुन आता भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली आहे. वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आता काँग्रेसचे नाव बदलून पाकिस्तान बेस्ड पार्टी केले पाहिजे, अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, एकीकडे राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीत दहशतवादाविरुद्ध कारवाईची मागणी करतात, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते हिंदू पीडितांची थट्टा करतात. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की पीडित खोटे बोलत होते का? त्यांनी काँग्रेसच्या दुटप्पी धोरणांवरही हल्ला चढवला आणि म्हणाले, “काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय धोरणावर वर्चस्व गाजवण्याची परवानगी दिली आहे. वडेट्टीवार हे तेच नेते आहेत ज्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानला क्लीन चिट दिली होती. पाकिस्तानबद्दल काँग्रेस किती उदारता दाखवेल?” असा आक्रमक सवाल शहजाद पूनावाला यांनी उपस्थित केला आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पूनावाला यांनी व्हिडिओ केला जारी
एका व्हिडिओमध्ये, शहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे की काँग्रेस नेते पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी सतत स्पर्धा करत आहेत. ते म्हणाले की, “आधी राष्ट्रवादी-शरद पवार गटातील अनिल देशमुख यांनी पाकिस्तानबद्दल विधान केले आणि आता विजय वडेट्टीवार म्हणतात की पाकिस्तान नव्हे तर सरकार जबाबदार आहे. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचा काही पुरावा आहे का?” असा सवाल त्यांनी विचारला.
मुख्तार अब्बास नक्वी यांनीही काँग्रेसवर टीका केली
भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही काँग्रेसवर टीका केली आणि म्हणाले, “काही लोक पाकिस्तानचे प्रॉक्सी भागीदार बनण्यासाठी स्पर्धा करत आहेत. हे त्यांच्या हिताचे नाही आणि देशाच्या हिताचेही नाही. जेव्हा संपूर्ण देश एकजुटीने पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी करत आहे, तेव्हा ते कोणत्या प्रकारच्या राजकीय युक्त्या खेळत आहेत?”
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पीडितांच्या बोलण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जान त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजय वडेट्टीवार म्हणाले, “जर सरकार युद्धासाठी तयार असेल तर त्यांनी लढावे, फक्त बोलून काहीही होणार नाही. ते पाकिस्तानचे पाणी थांबवण्याबद्दल बोलतात, पण त्यासाठी २० वर्षे लागतील.पहलगाममध्ये, काश्मीर खो-यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारलं. हे सगळं होत असताना मोदी सरकार काय करत होतं? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती?”