'विधानसभेला हे शोभणारं नाही, कारवाई झालीच पाहिजे'; विधानभवनातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहलगाममध्ये पर्यटकांवर लक्ष्य करुन त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून यावरुन मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून आले आहे. 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तर एकही नागरिक बेपत्ता नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “बऱ्याच नेत्यांना वेगवेगळी अधिकारी माहिती देत असतात. त्यानुसार नेते वक्तव्य करुन मते मांडत असतात. केंद्र सरकारच्या आदेशानंतर ज्या पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडायला हवा अशा नागरिकांची आम्ही यादी तयार केली आहे. त्यानुसार लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती त्यातून सुटलेली नाही. यादीमध्ये असलेल्या सर्वांना बाहेर पाठवले जाणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर आम्ही राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारचा निरोप पोहचवून त्यांना देश सोडण्यास सांगितले. राज्यातील पोलीस हे यादीतील सर्व लोक बाहेर जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या हालचाली ट्रॅक करत आहोत. याबाबत अंतिम आकडेवारी समोर आली की जाहीर केली जाईल. बऱ्याच वेळा आकडेवारीमुळे गोंधळ होत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अंतिम आकडेवारी देऊ. सर्व पाकिस्तानी लोकांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर काढल्यानंतर त्याची आकडेवारी देखील आम्ही जाहीर करु,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवेंद्र फडणवीस यांनी सिंधी समाजाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “सिंधी समाजातील हिंदू धर्मीय लोकांना परत जावं लागणार नाही. अनेक सिंधी लोक लाँग टर्म व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केले आहेत. त्यांनी भारत सोडण्याचं काहीच कारण नाही. केवळ मर्यादित कालावधीचा व्हिसा घेऊन भारतात आलेल्या नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. याबाबतची राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. उर्वरित काम काही वेळात पूर्ण होईल. अनेक पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात होते, त्यांची ओळख पटवून त्यांना माघारी पाठवले आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.