Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women reservation bill : लोकसभा गाजणार! सत्ताधाऱ्यांकडून अमित शाह तर विरोधकांकडून प्रियांका गांधी भिडणार

Women Reservation Bill : लोकसभेत आज महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर ऐतिहासिक चर्चेला सुरुवात झाली. १८ तास चालणाऱ्या या प्रदीर्घ चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार शाब्दिक होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 02:18 PM
BJP Amit Shah and Congress Priyanka Gandhi Debate on the Women Reservation Bill in Parliament Live

BJP Amit Shah and Congress Priyanka Gandhi Debate on the Women Reservation Bill in Parliament Live

Follow Us
Follow Us:
  • संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन
  • महिला आरक्षण विधेयकावर 18 तास चर्चा
  • अमित शाह आणि प्रियांका गांधींमध्ये होणार खडाजंगी
 

Women reservation bill : नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून महिलांच्या आरक्षणावर विधेयक मांडण्यात येणार आहे. महिला आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय या विशेष अधिवेशनमध्ये घेण्यात येणार आहे.यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विधेयकांकडे लागले आहे. यामध्ये तीन विधेयक मांडण्यात आली आहेत.(Parliament News) यामध्ये संसदेच्या जागा ५४३ वरून ८५०, मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक तसेच नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात येणार आहे. यामुळे पुढील तीन दिवस संसदेमध्ये जोरदार राजकीय वाद-विवाद होणार आहे.

आजपासून संसदेत महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ३ वाजता लोकसभेत या विधेयकावर आपले विचार मांडतील. याचबरोबर केंद्र सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या चर्चेला प्रतिसाद देणार आहे. सत्ताधारी पक्षाकडून अमित शाह हे सर्व प्रश्न आणि मुद्द्यावर उत्तरे देणार आहेत.

हे देखील वाचा : तीन दिवस, २८ तास आणि भारतीय लोकशाहीची नवी रचना; संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार?

लोकसभेत १६ एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी या विषयावर चर्चा होईल, त्यानंतर मतदान होईल. या विधेयकावर एकूण १८ तासांची चर्चा नियोजित असून, उद्या दुपारी ४ वाजता मतदान होण्याची शक्यता आहे. या विशेष अधिवेशनामध्ये विरोधकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. काँग्रेसने पहिल्या दिवशी भाषण करणाऱ्या नेत्यांची यादी अंतिम केली आहे. यामध्ये गौरव गोगोई, प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, मनीष तिवारी, परिणीती शिंदे, के. सुरेश आणि मोहम्मद जावेद यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे नाव नाही.

संपूर्ण देशाचे संसदेतील घडामोडींवर लक्ष 

विरोधकांकडून प्रियांका गांधी या प्रामुख्याने महिला आरक्षण विधेयकासंबंधित प्रश्न उपस्थित करणार आहेत. तर अमित शाह हे सत्ताधाऱी पक्षाकडून उत्तर देणार आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणावरुन खडाजंगी होताना दिसून येईल. यामुळे संसदेचे वातावरण हे तीन दिवसांसाठी तापलेले दिसून येणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष हे महिला आरक्षणाच्या मुद्द्याकडे लागले आहे.

हे देखील वाचा : महिला आरक्षणाच्या आडून सत्ताधाऱ्यांची राजकीय चाल? ‘हे’ मुद्दे चर्चेत

भाजपचे कोण असणार वक्ते?

भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रमुख नेतेही चर्चेत सहभागी होणार आहेत. यामध्ये कंगना रणौत, अपराजिता सारंगी, रक्षा खडसे, तेजस्वी सूर्या आणि बासुरी स्वराज यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्जुन राम मेघवाल हेदेखील सभागृहाला संबोधित करतील. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेसंदर्भात आज संसदेत तीव्र राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

वाद का आहे?

महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा सर्वात मोठा आक्षेप दोन मुद्द्यांवर केंद्रित आहे: पहिला, घटनादुरुस्तीद्वारे लोकसभेच्या जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव. दुसरा, या विस्तारासाठी आणि जागांच्या पुनर्रचनेसाठी स्पष्ट सूत्राचा अभाव. विधेयकाचे कलम ८, जे पुनर्रचनेशी संबंधित आहे, त्यात केवळ असे म्हटले आहे की पुनर्रचना आयोग २०११ च्या जनगणनेच्या आधारे जागांचे पुनर्वितरण करेल आणि त्यांचे मतदारसंघ निश्चित करेल, परंतु जागा कोणत्या आधारावर वाढवल्या जातील हे त्यात स्पष्ट केलेले नाही.

Web Title: Bjp amit shah and congress priyanka gandhi debate on the women reservation bill in parliament live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Parliament News
  • Priyanka Gandhi
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
1

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
2

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.