Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Election Strategy: पद्म पुरस्कारांतून भाजपची ‘केरळ’निवडणूक रणनीती; टीकाकारांच्या सन्मानातून भाजप नेमकं काय साधू पाहतयं?

भाजप आणि आरएसएसचे प्रखर टीकाकार असूनही अच्युतानंदन यांचा गौरव करून भाजपने "आम्ही वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन कामाचा आदर करतो," असा संदेश दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 12:28 PM
BJP Election Strategy: पद्म पुरस्कारांतून भाजपची ‘केरळ’निवडणूक रणनीती; टीकाकारांच्या सन्मानातून भाजप नेमकं काय साधू पाहतयं?
Follow Us
Close
Follow Us:
  • केरळचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि कट्टर भाजप विरोधक व्ही.एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’,
  • डाव्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी आणि सामान्य मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी ही भाजपची रणनीती
  • हेमंत सोरेन यांचा पक्ष काँग्रेसपासून फारकत घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करू शकतो
BJP Strategy for Kerala Elections: यंदाच्या प्ररजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये केंद्र सरकारने राजकीय वैविध्य जपल्याचे पाहायला मिळत आहे. केरळचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि कट्टर भाजप विरोधक व्ही.एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’, तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ जाहीर करून मोदी सरकारने सर्वांनाच चकित केले आहे. पण त्याचवेळी आपल्याच टिकाकारांना पुरस्कार देण्यामागे भाजपचा नेमका काय हेतू असू शकतो, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Padma Award 2026: तामिळनाडूत १३. बंगालमध्ये ११ पद्म पुरस्कार…; पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची तिरपी चाल

निवडणुकीवर डोळा?

भाजप आणि आरएसएसचे प्रखर टीकाकार असूनही अच्युतानंदन यांचा गौरव करून भाजपने “आम्ही वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन कामाचा आदर करतो,” असा संदेश दिला आहे. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. डाव्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी आणि सामान्य मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी ही भाजपची रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. पुरस्कारांमुळे केरळच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिबू सोरेन यांना पद्मभूषण: झारखंडमध्ये नवा राजकीय संकेत?

केंद्र सरकारने झारखंडचे दिग्गज आदिवासी नेते शिबू सोरेन यांना ‘पद्मभूषण’ जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या पुरस्काराकडे केवळ सन्मान म्हणून न पाहता, भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांच्यातील संभाव्य जवळीकीचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.

Republic Day Parade Live Streaming: प्रजासत्ताक दिनाची परेड घरबसल्या पाहा; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’

त्याचवेळी बिहार निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, हेमंत सोरेन यांचा पक्ष काँग्रेसपासून फारकत घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. सर्व प्रयत्नांनंतरही झारखंडमधील आदिवासी मतपेढी पूर्णपणे भाजपच्या बाजूने वळलेली नाही. त्यामुळे शिबू सोरेन यांच्या प्रभावाचा वापर करून या वर्गाला आपलेसे करण्याची भाजपची रणनीती असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात, हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्याचा बातम्याही समोर आल्या आहे. त्यानंतरच केंद्र सरकार शिबू सोरेन यांना भारतरत्न किंवा पद्मश्री देऊन झारखंड मुक्ती मोर्चाला राजकीय संकेत देऊ शकते.

मोदी सरकारने विरोधकांना सन्मानित करण्याची भूतकाळातील उदाहरणे

मोदी सरकारने वैचारिक किंवा राजकीय विरोधकांना सन्मानित करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेक वेळा सरकारने प्रमुख राजकीय नेत्यांना पद्मविभूषण किंवा भारतरत्न प्रदान केले आहे, विशेषतः महत्त्वाच्या निवडणुकीच्या काळात.

२०२३ मध्ये मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण (मरणोत्तर)
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न
२०२४ च्या आंध्र प्रदेश निवडणुकीपूर्वी पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न (मरणोत्तर)
२०२१ मध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना पद्मभूषण
२०१७ मध्ये शरद पवार यांना पद्मविभूषण
२०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण

 

याशिवाय, मोदी सरकारने काँग्रेसचे एस.सी. जमीर, तोखेहो सेमा, पीडीपी नेते मुझफ्फर बेग आणि अकाली दलाचे तरलोचन सिंग यांना पद्म पुरस्कार प्रदान केले आहेत. २०२४ मध्ये, सरकारने पी.व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले. त्याच वर्षी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आले. २०२२ मध्ये, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्मभूषण देण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी नकार दिला.

Web Title: Bjp election strategy bjps kerala election strategy through padma awards what exactly is the bjp trying to achieve by honoring its critics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Jharkhand Election
  • Kerala News

संबंधित बातम्या

Purandar Politics: पुरंदरमध्ये महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने
1

Purandar Politics: पुरंदरमध्ये महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने

नरेंद्र मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान? नितीन नबीन राजकारणाच्या पटलावरचे ठरणार प्यादे की वजीर?
2

नरेंद्र मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान? नितीन नबीन राजकारणाच्या पटलावरचे ठरणार प्यादे की वजीर?

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप
3

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप

कर्नाटकात 2500 कोटींचा घोटाळा; भाजपचा गंभीर आरोप, ‘या’ मंत्र्याची केली गेली राजीनाम्याची मागणी
4

कर्नाटकात 2500 कोटींचा घोटाळा; भाजपचा गंभीर आरोप, ‘या’ मंत्र्याची केली गेली राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.