तामिळनाडूत १३. बंगालमध्ये ११ पद्म पुरस्कार, पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची तिरपी चाल
Padma Award 2026: भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यात पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या दृष्टीने केंद्र सरकारकडून या राज्यामधील काही दिग्गजांना पुरस्कार देण्यात आले आहेत. सरकारने अधिकृत यादी देखील जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, तामिळनाडूमध्ये सर्वाधिक १३ जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ११, केरळमध्ये ७, आसामध्ये ५ आणि त्रिपुरातील १ व्यक्तीला पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
तामिळनाडूतील १३ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी यांना वैद्यकशास्त्रासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. SKM मैलनंदन यांना सामाजिक कार्यासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गायत्री बालसुब्रमण्यम आणि रजनी बालसुब्रमण्यम यांना संयुक्तपणे कला मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. HV हांडे यांना वैद्यकशास्त्रात पद्म, के. रामा स्वामी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, के. विजय कुमार यांना नागरी सेवेत, ओथुवर थिरुथनी स्वामीनाथन यांना कला, पुनियामूर्ती नटेसन यांना वैद्यक शास्त्रात, आर. कृष्णन यांना कला, राजस्थानपती कलिअप्पा गौंदर यांना कला, शिवा शंका बरुत्तेरी यांना शिक्षणात, शिवा शंका बृहत्तर यांना कला विषायासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बंगालमधील ११ पुरस्कार विजेत्यांमध्ये अशोक कुमार हलदर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला आहे. गंभीर सिंग योंजोन यांना साहित्य आणि शिक्षणात पद्मश्री, कला मध्ये हरी माधव मुखोपाध्याय, कला मध्ये ज्योतिष देबनाथ, कला मध्ये कुमार बोस, साहित्य आणि शिक्षण मध्ये महेंद्र नाथ, कला मध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी, साहित्य आणि शिक्षण मध्ये रवी लाल टुडू, वैद्यक मध्ये सरोज मंडल, कला मध्ये तरुण भट्टाचार्य आणि कला मध्ये तृप्ती मुखर्जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
केरळमधून पद्म पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केटी थॉमस, सार्वजनिक क्षेत्रातील पी. नारायण, सार्वजनिक क्षेत्रातील व्ही.एस. अच्युतानंदन, कला क्षेत्रातील मामूटी, सार्वजनिक क्षेत्रातील वेल्लापल्ली नटेसन, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील ए.ई. माथुनयगम, कला क्षेत्रातील कलामंडलम विमला मेनन आणि सामाजिक कार्यासाठी कोल्लाकल देवकी अम्मा जी यांचा समावेश आहे.
आसाममधील ज्या पाच जणांना हा पुरस्कार मिळाला त्यात कला क्षेत्रातील हरिचरण सैकिया, सार्वजनिक क्षेत्रातील कबींद्र पुरकायस्थ, कला क्षेत्रातील नुरुद्दीन अहमद आणि कला क्षेत्रातील पोखिला लेखेपी यांचा समावेश आहे.
याशिवाय त्रिपुराचे राजा चंद्र देव वर्मा यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.






