BJP leader Sambit Patra's reply to Rahul Gandhi on Gautam Adani case allegations
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतमी अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेने अदानी यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता अदानी उद्योग समूह अडचणीत आला आहे. या प्रकरणामुळे फक्त अमेरिकेत नाहीत तर आपल्या देशात देखील एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानी यांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, “जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्रित आहेत तोवर ते सुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानी यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करणार आहेत. गौतम अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जेलमध्ये जातील. भाजपचा निधी त्यांच्याशी जोडलेला आहे,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आता भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. अमेरिकेत दाखल खटल्यात काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख आहे, आरोप झालेल्या चारही राज्यात आमचं सरकार नव्हतं असा घणाघात संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
“भारत सतत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे गांधी परिवार आणि काँग्रेस परिवाराला सहन होत नाही. म्हणूनच ते (गांधी कुटुंब आणि काँग्रेस परिवार) भारतीय बाजारपेठेवर हल्ला करत आहेत. पहाटे चार वाजल्यापासून त्यांची संपूर्ण रचना भारतीय शेअर बाजार खाली आणण्यात गुंतलेली असते. त्यामुळे सुमारे अडीच कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे,” असा घणाघात संबित पात्रा यांनी केला आहे.