Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संविधानावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप खासदारावर टीका; कॉंग्रेसने शेअर केला व्हिडिओ

संविधानाबाबत केलेल्या या वादग्रस्त विधानावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2024 | 06:40 PM
संविधानावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप खासदारावर टीका; कॉंग्रेसने शेअर केला व्हिडिओ
Follow Us
Follow Us:

दिल्ली – आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभा यांचे सत्र वाढले आहेत. आरोप प्रत्यारोप विरोधकांवर केले जात असून राजकीय टीका टिप्पणी केल्या जात आहेत. दरम्यान, भाजपच्या एका उमेदवाराने वादग्रस्त विधान केले आहे. संविधानाबाबत केलेल्या या वादग्रस्त विधानावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.

भाजपचे फैजाबादमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार लल्लू सिंह यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपने पॉलिटिकल कॅपेनमध्ये अब की पार 400 पार चा नारा दिला आहे. 400 हून अधिक जागा निवडणून येणार असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र 400 पार खासदार का निवडणून यायला पाहिजे याबाबत लल्लू सिंह यांनी धक्कादायक दावा केला आहे.

प्रचारावेळी बोलताना विद्यमान खासदार आणि उमेदवार लल्लू सिंह यांनी वादग्रस्त विधान केले. देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे, पण संविधानात दुरुस्ती करण्यासाठी किंवा संविधान बदलण्यासाठी दोन तृतियांश जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा नियमही बदलावा लागेल आणि संविधान देखील बदलावं लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापले असून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

PDA भाजपा को मिलकर हराएगा क्योंकि भाजपा पिछड़ों, दलितों, अल्पसंख्यकों को मिले आरक्षण को, नया संविधान बनाकर ख़त्म करना चाहती है। भाजपा जनता की सेवा या कल्याण के लिए नहीं बल्कि बाबा साहेब भीमराव अम्बेडकर जी द्वारा बनाए संविधान को बदलने के लिए जीतना चाहती है। सदियों से 4-5%… pic.twitter.com/bvFf1AioXX — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2024

काँग्रेसकडून टीका

काँग्रेसने या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसचे नेता पवन खेरा यांनी लल्लू सिंह यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, स्वत: बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत. पण, आता अयोध्येतील भाजपचे विद्यमान खासदार लल्लू सिंह उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. ४०० जागांची जनतेला मागणी करत आहेत. मोदी यांना मनापासून माफ करु शकतील का? असा सवाल पवन खेरा यांनी केलाय. त्याचबरोबर अखिलेश यादव यांनी देखील व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

Web Title: Bjp mp criticized for controversial statement on constitution congress shared the video nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2024 | 06:40 PM

Topics:  

  • Congress
  • loksabha election 2024
  • political news

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
1

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
2

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
3

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.