Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली धक्काबुक्की? खासदारांच्या आरोपांवर दिले चोख उत्तर

संसदेमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. राहुल गांधींनी धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 19, 2024 | 02:22 PM
आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले

आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशामध्ये आणि राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्रातील हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी लढत होताना दिसत आहे. राज्यसभेमध्ये भाजप नेते व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. यामुळे संसदेमध्ये टीका टिप्पणी सुरु असताना आता भाजप खासदाराने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी त्यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप प्रताप चंद्र सारंगी यांनी केला आहे. मी पायऱ्यांवर उभा होतो, त्यावेळी राहुल गांधी यांनी एकाला धक्का दिला. ते माझ्या अंगावर पडले आणि मी राहुल गांधींमुळे जखमी झालो असं सारंगी यांनी म्हटलं आहे. सारंगी यांना आता रुग्णालयात नेण्यात आलं आहे तसंच या प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे. या प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या धक्काबुक्की केल्याच्या आरोपावर उत्तर दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे.” असं राहुल गांधी स्पष्टपणे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी जेष्ठ नेते व कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले की, मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तर संसदेच्या आवारात झालेल्या या धक्काबुक्कीवर रोष व्यक्त केला जात आहे. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने सत्ताधारी व विरोधी खासदारांमध्ये झालेली धक्काबुक्की निंदनीय असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तर राहुल गांधी यांची धक्काबुक्की केल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. भाजप खासदारांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Bjp pratap chandra sarangi and congress rahul gandhi clash on the steps of parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 02:22 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला
1

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
2

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.