Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूसकी अजून जिवंत आहे! रक्तदात्यांच्या गर्दीनं फुलून गेलं रुग्णालय, जखमींना रक्त देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं आलीत पुढे

शेकडो स्थानिक तरुण रेल्वे अपघातातील जखमींना रक्त देण्यासाठी रांगेत उभे आहेत. स्वत:च्या वाहनाने येवून ते कडक उन्हातही रक्तदान करण्यासाठी थांबले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 03, 2023 | 03:04 PM
माणूसकी अजून जिवंत आहे! रक्तदात्यांच्या गर्दीनं फुलून गेलं रुग्णालय, जखमींना रक्त देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं आलीत पुढे
Follow Us
Follow Us:

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताने (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेतील पीडितांना केवळ सरकारच मदत करत नाही, तर घटनास्थळाच्या आसपासचे लोकही पुढे आले आहेत. एनडीआरएफ, लष्कर, पोलीस, डॉक्टरांपासून ते सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण बचाव कार्यापासून ते रुग्णालयांपर्यंत मदत करत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये मानवतेचे एक उत्तम उदाहरण सध्या समोर आलं आहे. ओडिशातील तरुण रेल्वे अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी संसाधनांपासून ते रक्तापर्यंत सर्व काही देण्यास तयार आहेत. बालासोर रुग्णालयात रक्तदानासाठी गर्दी होत आहे.

[read_also content=”रेल्वेरुळ झाले वेगळे, चाकं निघाली; गॅस कटरने बोगी कापून बाहेर काढले जात आहेत मृतदेह https://www.navarashtra.com/india/odisha-train-accident-death-toll-rises-to-233-900-people-are-serious-railway-minister-ashwini-vaishnav-presented-nrps-409143.html”]

रक्तदात्यांची रुग्णालयात गर्दी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील रुग्णालयांमधून समोर आलेल्या चित्रांमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, शेकडो स्थानिक तरुण रेल्वे अपघातातील जखमींना रक्त देण्यासाठी रांगेत उभे आहेत. स्वत:च्या वाहनाने येवून ते कडक उन्हातही रक्तदान करण्यासाठी थांबले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, ‘एम्स भुवनेश्वरमधून डॉक्टरांच्या दोन टीम बालासोर आणि कटकला अपघातस्थळी पाठवण्यात आल्या आहेत. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक मदत आणि वैद्यकीय मदत देत आहोत. सोरो मेडिकल युनिटमधील जखमी प्रवाशांना रेल्वेकडून ५०,००० रुपयांची सानुग्रह रक्कम सुपूर्द करण्यात आली.

तर, मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय हवाई दलाने दोन Mi-17 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. जमिनीच्या पातळीवर रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने बचावकार्य सुरू आहे. याशिवाय अनेक जादा बसेस आणि ट्रेनच्या डब्यांचीही व्यवस्था करण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले जात आहे.

भारतीय लष्करही मदतीला

जखमी नागरिकांना वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहे. पूर्व कमांडकडून रुग्णवाहिका आणि सहाय्यक सेवांसह लष्कराची वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचावे यासाठी अनेक ठिकाणांहून पथके पाठवण्यात आली आहेत.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही रेल्वे अपघातानंतर प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहेत. या रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. त्याचवेळी अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान हे दोन केंद्रीय मंत्री घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना 12 लाख रुपये मदत जाहीर

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सांगितले की, ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50-50 हजार रुपये दिले जातील. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2-2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Blood donners of balasore are waiting in queue to donate blood to save people in odisha train accident nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2023 | 02:53 PM

Topics:  

  • Odisha Train Tragedy
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.