Bomb Threat: सुप्रीम कोर्ट आणि अलाहाबाद हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'हे' कारण आले समोर
नवी दिल्ली: पाकिस्तान हा कायमच दहशतवाद भारतात पसरवण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान सध्या मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट, अलाहबाद हायकोर्ट आणि प्रयागराज रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉईस मेसेजद्वारे हि धमकी देण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडे यांना ही धमकी देण्यात आली आहे.
आशुतोष पांडे हे श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष असून त्यांनी जन्मभूमी शाही इदगाह प्रकरणी खटला दाखल केला आहे. आशुतोष पांडे यांना व्हाट्सॲपवर व्हॉईस मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री ही धमकी देण्यात आली आहे. आज अलाहाबाद हायकोर्टात मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही इदगाह प्रकरणी सुनावणी होणार होती. त्याआधीच हा धमकीचा मेसेज आशुतोष पांडे यांना आला आहे. हे धमकीचे नंबर पाकिस्तानमधील एका नंबरवरून आल्याचे समोर येत आहे. अलाहाबाद हायकोर्टमध्ये आज श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह प्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होणार आहे.
काय आहे धमकीचा मेसेज?
धमकी देणारया व्यक्तीने 4 ते 15 सेकंद अशा वेळेतील 6 व्हॉईस मेसेज पांडे यांना पाठवले. तुमचे हायकोर्टच काय आम्ही तुमचे सुप्रीम कोर्ट देखील उडवून देऊ, अशा प्रकाची धमकी देण्यात आली आहे. तुमच्यात एवढी ताकद नाही. भारतातील मोठी मंदिरे उडवून देऊ, त्यासोबत अलाहाबाद हायकोर्ट आणि प्रयागराज रेल्वे स्थानक देखील उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा: Bomb Threat: नागपूर-कोलकाता विमानात बॉम्बची धमकी, थेट रायपूर विमानतळावर केले…
काय आहे मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह वाद?
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद अनेक दशके जुना आहे. मथुराचा हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीच्या मालकीशी संबंधित आहे. 12 ऑक्टोबर 1968 रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. या करारात 13.7 एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, श्रीकृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. हिंदू बाजूने शाही इदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंकडून होत आहे.
इतिहास काय सांगतो?
असा दावा केला जातो की औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर 1770 मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. 1935 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना 13.37 एकर जमीन दिली. 1951 मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन संपादित केली.