विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारा कॅप्टन स्मित मच्छार; 18 वर्षांच्या सेवेतील भयानक अनुभव
नवी दिल्ली : दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानातील 180 प्रवाशांसाठी बुधवारचा (दि.30) दिवस एक भयानक अनुभव ठरला. हजारो फूट उंचीवर, जेव्हा सह-वैमानिकाने अचानक मुख्य वैमानिक भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केला, तेव्हा एकच गोंधळ उडाला. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील बुधवारी घडलेल्या घटनेनंतर भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव चर्चेत आले आहे.
फ्लायदुबईच्या विमानातील कॉकपिटमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या परिस्थितीत विमानाचे नियंत्रण राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. मच्छार यांच्याबाबत उपलब्ध व्यावसायिक माहितीनुसार, त्यांना बोईंग-७३७ विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. स्मित मच्छार यांनी आपल्या वैमानिक कारकिर्दीची महत्त्वाची वर्षे भारतातील स्पाईसजेटमध्ये घालवली. तेथे त्यांनी सुमारे ११ वर्षे सेवा बजावली. या काळात ते पायलट-इन-कमांड आणि वरिष्ठ कमांडर म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर २०२० पासून त्यांनी लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणूनही काम केले. या भूमिकेत इतर वैमानिकांच्या प्रशिक्षणासह त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
Flight Turbulence फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…
मच्छार यांच्या एकूण उड्डाण अनुभवाचा आकडा सुमारे ९७५० तास असल्याचे त्यांच्या व्यावसायिक प्रोफाइलमध्ये नमूद आहे. बोईंग ७३७-८००, ७३७ मॅक्स-८ आणि ७३७ मॅक्स-९ या विमानांवर त्यांनी उड्डाण केले आहे. दीर्घकाळाच्या वैमानिक अनुभवामुळे बोईंग ७३७ मालिकेतील विमानांच्या संचालनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. वैमानिक म्हणून काम करण्याबरोबरच मच्छार यांनी प्रशिक्षण क्षेत्रातही भूमिका बजावली आहे.
लाइन ट्रेनिंग कॅप्टनचाही अनुभव
लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून त्यांनी अन्य वैमानिकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेत सहभाग घेतला. फ्लायदुबईमध्ये रुजू होताना त्यांनी थेट कॅप्टन पदावर प्रवेश केला होता. अशा प्रकारची नियुक्ती आधीपासून अनुभवी वैमानिकांना दुसऱ्या विमान कंपनीत थेट कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यासाठी केली जाते.
ग्रीसमध्येही आव्हानात्मक स्थितीत महत्त्वाची भूमिका
ग्रीसमधील मायकोनोस विमानतळावर उतरताना, कॅप्टन स्मित यांना अत्यंत धोकादायक हवामानाचा सामना करावा लागला. जोरदार वारे वाहत होते आणि अचानक विंडशियर (वाऱ्याची दिशा आणि वेगात होणारा तीव्र बदल) निर्माण झाला, ज्यामुळे विमान थेट जमिनीवर आदळू शकले असते. अशा परिस्थितीत चुकीला अजिबात वाव नसतो. न घाबरता, स्मित यांनी सिम्युलेटरमध्ये शिकलेले विंडशियर एस्केप तंत्र वापरले, विमानाला पूर्ण शक्ती दिली आणि सुरक्षितपणे विमान उतरवले.






