Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉकेटसोबत जोडण्यात आलं चांद्रयान-3, पुढच्या आठवड्यात चंद्रावर उतरून करणार वातावरणाचा अभ्यास

चांद्रयान-3 LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

  • By साधना
Updated On: Jul 06, 2023 | 03:01 PM
chandrayaan 3

chandrayaan 3

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो (ISRO) च्या  चंद्र मोहिमेबाबत (ISRO Moon Mission) नवी अपडेट समोर आली आहे.(Indian Space Research Organization) चांद्रयान-3 लाँच व्हेइकल रॉकेटसोबत जोडलं गेलं आहे. चांद्रयान 3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

इस्त्रोने सांगितलं की, चांद्रयान 3 ला महत्त्वाचा भाग रॉकेट लाँचरसोबत जोडण्यात आला आहे. ‘चांद्रयान-3’ ची एन्कॅप्स्युलेटेड असेंबली बुधवारी, 5 जुलै लाँच व्हेईकल (LVM3) शी जोडण्यात आलं आहे. लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM3) हे रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलं आहे.

?LVM3-M4/Chandrayaan-3?️ Mission:

Today, at Satish Dhawan Space Centre, Sriharikota, the encapsulated assembly containing Chandrayaan-3 is mated with LVM3. pic.twitter.com/4sUxxps5Ah

— ISRO (@isro) July 5, 2023

जुलै महिन्यातच चांद्रयान-3 चं प्रक्षेपण
इस्त्रो (ISRO) ने ट्विट करून माहिती दिली आहे की, चांद्रयान-3 श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये LVM3 रॉकेटशी जोडलं गेलं आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली होती. साधारणपणे 13 ते 19 जुलै दरम्यान चांद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून वातावरणाचा करणार अभ्यास
चांद्रयान ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. चांद्रयान 3 इस्त्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. याआधीच्या चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.

सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार प्रक्षेपण
चांद्रयान-3 LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्त्रोकडून चांद्रयान 3 लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान 3 च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.

Web Title: Chandrayaan 3 isro gave update about moon mission nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 02:57 PM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • india
  • ISRO
  • The Moon Mission

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.