श्रीनगर : भारत-चीनदरम्यान (India-China) अद्यापही तणावाचे (Tention) ढग दूर झालेले नाहीत. चीनी लष्कराचे एक विमान लडाखजवळील (Ladakh) लाईन अॅक्च्युअल ऑफ कन्ट्रोल अर्थात एलएसी (LAC) जवळ घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे. याची गंभीर दखल भारतीय हवाई दलाने घेतली असून थेट चीनी एअरफोर्सकडे (Chinese Airforce) तक्रार केली आहे.
चीनने यापूर्वी अनेकदा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन (Violation Of Airspace) केले आहे. पूर्व लडाखमध्य़े चीनच्या बाजूने चीनने आपली टेहळणी विमाने (Reconnaissance Aircraft) उडवली आहेत. यावेळी, भारतीय हवाई दलाच्या रडारवर (Indian Airforce) सीमेवर घिरट्या घालणारे हे चीनी विमान दिसून आले. पूर्व लडाखमधील सीमाभागात चीनी हवाई दलाकडून महत्त्वाचा युद्ध सराव कार्यक्रम घेण्यात आला. या ड्रिलदरम्यान हा प्रकार घडला असून चीनने डिफेन्स उपकरणांचा वापर केला.
या प्रकाराची भारताने गंभीर दखल घेतली असून चीनला अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ नयेत याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी २०२० मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये चीनचे जवळपास ४०, तर भारताचे २० सैनिक मारले गेले होते.