पालघरमध्ये विकास कामांची देयके न मिळाल्यामुळे शेकडो ठेकेदारांनी मुसळधार पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पूर्ण केलेल्या कामांना वर्ष उलटूनही सरकारकडून मोबदला न मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांहून अधिक कामांचे पैसे रखडले असून त्यामुळे ठेकेदारांसह हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनाला मजूर सहकारी सोसायट्यांनीही पाठिंबा दर्शवला असून मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.