Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! सीजेपीच्या 3 पैकी 2 मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने मागितला वेळ? CJPचा मोठा दावा

कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने दावा केला आहे की, त्यांच्या दोन प्रमुख मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा अवधी मागितल्याचे CJPने म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 24, 2026 | 03:58 PM
मोठी बातमी! सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने मागितला वेळ? CJPचा मोठा दावा

मोठी बातमी! सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने मागितला वेळ? CJPचा मोठा दावा

Follow Us
Follow Us:
  • सीजेपीच्या 3 पैकी 2 मागण्या मान्य
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने मागितला वेळ?
  • CJPचा मोठा दावा
Dharmendra Pradhan Resignation: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर उपोषण संपवले आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) नेतृत्वाखालील सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक २८ जूनपासून उपोषणावर होते. त्यांनी सांगितले की, २६ दिवसांनंतर त्यांनी आपले उपोषण संपवले आहे.

दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले, “सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.”

याचदरम्यान कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेत महत्त्वाची प्रगती झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या बैठकीत CJPच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. जवळपास एक तास चाललेल्या बैठकीत आंदोलनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

CJP Meeting Govt Meeting: धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार? CJPसोबत केंद्राची मिटींगबाबत मोठी अपडेट

बैठकीदरम्यान CJPने केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. पक्षाच्या म्हणण्यानुसार, सरकारने त्यापैकी दोन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या आहेत. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

CJPने स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पक्ष ठाम असून ही मागणी मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही. सरकारने या विषयावर निर्णय घेण्यासाठी उद्या (दुपारपर्यंत) वेळ मागितला आहे. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारची अधिकृत भूमिका CJPला कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, CJPने सरकारच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेनंतर पक्षाने महत्त्वाचे दावे केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतची मुदत मागितली आहे. रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार धर्मेंद्र प्रधान यांना लवकरच पदावरून दूर करेल, अशी आशा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सरकारसोबत झालेल्या चर्चेत काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, CJPने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामध्ये NEET प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाई देणे आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे तसेच इतर कायदेशीर खटले मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, त्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितल्याचे रांका यांनी स्पष्ट केले. सरकारचा अंतिम निर्णय आल्यानंतर पुढील भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

NEET Paper: ‘विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तडजोड नाही’; कोर्टाचे सरकारला खडे बोल, NEET परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Web Title: Cjp says government positive on two demands seeks time till tomorrow on dharmendra pradhan resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • CJP
  • Cockroach Janata Party
  • Dharmendra Pradhan

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.