Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“……मत व्यक्त करून आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला असं म्हणता येणार नाही….”; CM स्टॅलिन यांच्यावर बातमी करणाऱ्या यू-ट्यूबरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

  • By युवराज भगत
Updated On: Apr 08, 2024 | 03:36 PM
Stalin Youtuber Row : Supreme Court's relief to YouTuber criticizing CM Stalin! The court said, in the run-up to the election...

Stalin Youtuber Row : Supreme Court's relief to YouTuber criticizing CM Stalin! The court said, in the run-up to the election...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या सत्ताई दुराईमुरुगन या युट्यूबरला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. त्याचा जामीन पूर्ववत करत कोर्टानं एक महत्वाची टिप्पणीही केली. “जर निवडणुकांपूर्वीच आपण प्रत्येकाला अशा पद्धतीनं तुरुंगात टाकायला सुरुवात केली तर कल्पना करा किती जण तुरुंगात जातील” असं कोर्टानं म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टात घेतली धाव
एमके स्टॅलिन आणि इतरांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दुराईमुरुगन याला अटक केली होती. यापूर्वी, मद्रास हायकोर्टानं त्याला जामीन मंजूर करताना तो पुन्हा कोणाच्याही विरोधात अपमानास्पद टिप्पणी करणार नाही अशी अट घातली होती. पण, जून 2022 मध्ये तामिळनाडू सरकारनं हमीपत्र दाखल केल्यानंतरही आरोपीनं सीएम स्टालिन यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करणं सुरू ठेवल्यानं या युट्युबरचा जामीन रद्द करण्यासाठी तामिळनाडू सरकारनं हायकोर्टात धाव घेतली, त्यानंतर हायकोर्टानं त्यांचा जामीन रद्द केला. यानंतर युट्युबरनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
स्वातंत्र्याचा गैरवापर नाही
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय फिरवला आणि त्याला पुन्हा जामीन मंजूर केला. हा जामिन मंजूर करताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, “हायकोर्टानं यापूर्वी मुरुगन याला अंतरिम जामीन दिला त्यानुसार तो अडीच वर्षे जामिनावर आहे. पण त्यानं स्टॅलिन यांना विरोध करून किंवा मत व्यक्त करून आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला असं म्हणता येणार नाही,” असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
त्याचबरोबर “युट्युबरचा जामीन रद्द करण्यामागचं सबळ कारण दिसत नाही. त्यामुळं आम्ही अशा प्रकारे जामीन रद्द करण्याचा हायकोर्टाचा आदेश रद्द करतो आणि जामीन मंजूर करणारा पूर्वीचा आदेश लागू ठेवतो. योग्य वाटल्यास जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही” अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं आपला निकाल दिला.

Web Title: Cm mk stalin vs youtuber supreme courts relief to youtuber criticizing cm stalin nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 03:33 PM

Topics:  

  • Supreme Court

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.