
10 Oct 2026 11:23 AM (IST)
CJP Protest Live Updates: आज जंतर मंतर येथे होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा दलांनी धौला कुआँ येथे अनेक कंटेंट क्रिएटर्ससह आंदोलकांना ताब्यात घेतले. तर सिंघू सीमेवर (दिल्ली-हरियाणा सीमा) सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.
10 Oct 2026 11:15 AM (IST)
'कॉकरोच जनता पार्टी'च्या कायदेशीर टीमच्या प्रमुख रत्ना सिंह म्हणाल्या, "मला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, परंतु माझ्या अटकेचे कारण उघड करण्यात आलेले नाही."
10 Oct 2026 10:56 AM (IST)
CJP Protest Live Updates: सीजेपी'चे अध्यक्ष अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत आज होणाऱ्या आंदोलनासाठी हे तिघेही दिल्लीला निघाले होते. पण विमानतळावरच दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
10 Oct 2026 10:42 AM (IST)
पोलिसांचा बंदोबस्त भेदून, अंदाजे १०० ते १५० आंदोलक कनॉट प्लेस येथे पोहोचण्यात यशस्वी झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ते गटागटाने आले होते.
10 Oct 2026 10:41 AM (IST)
CJP Protest Live Updates: शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गुरुग्राममधील सेक्टर ५५ (किंवा ५६) मधील निवासस्थानातून क्राईम ब्रँचच्या पथकांनी युट्यूबर ध्रुव राठी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला क्राईम ब्रँचच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे त्याची सुमारे एक तास चौकशी करण्यात आली आणि त्याने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, क्राईम ब्रँचचे पथक ध्रुव राठीला तीन वाहनांच्या ताफəतून द्रुतगती मार्गावरील राजीव चौकमार्गे दिल्लीकडे घेऊन रवाना झाले.
या घडामोडींमुळे राजधानी दिल्लीतील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण अधिकच तापले असून, CJP च्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
10 Oct 2026 10:36 AM (IST)
– निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली
– राजधानीत आज दारूची दुकाने बंद
– सीजेपीच्या आंदोलनात काँग्रेसचा सहभाग नाही, डावे आणि आप सहभागी होणार
– गौतम बुद्ध नगर आयुक्तालयात बीएनएसएसचे कलम १६३ लागू
– २०,००० पोलीस आणि २३,००० सीएपीएफ जवान तैनात
– दिल्ली मेट्रो व्यतिरिक्त, २५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
– जनपथ-कर्तव्य पथ चौकाच्या ४ किलोमीटर परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित
10 Oct 2026 10:28 AM (IST)
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. युट्युबर ध्रुव राठी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ड्रोनच्या साहाय्याने अनेक भागांवर सतत पाळत ठेवत आहेत. जंतर मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क आहे. दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आली आहेत.
10 Oct 2026 10:27 AM (IST)
मोदी सरकारची एवढी हुकूमशाही योग्य नाही, जनता नक्कीच प्रत्युत्तर देईल.
मोदी सरकार की इतना ज्यादा तानाशाही ठीक नहीं है,
जनता जवाब जरूर देगी। https://t.co/Bi9N2ZrVyG
— Cockroaches of India (@CJP_for_India) October 10, 2026
10 Oct 2026 10:25 AM (IST)
अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका जंतरमंतरवर जाण्यासाठी निघाले आहेत.
Abhijit Dipke,Saurav Das and Ashutosh Ranka are arriving at Jantar Mantar. https://t.co/TlS04Hk1ER
— Cockroaches of India (@CJP_for_India) October 10, 2026
10 Oct 2026 10:23 AM (IST)
ध्रुव राठी यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे; अभिजीत दीपके, आशुतोष आणि सौरभ दास यांनीदेखील ते सकाळी १०:३० वाजता दिल्ली विमानतळावर उतरतील आणि त्यांनाही विमानतळावरच नक्की ताब्यात घेतले जाऊ शकते. असा दावा केला आहे. आंदोलनाचे नेते सहजपणे स्वतःला ताब्यात करून घेत आहेत, तर कल्पना करा की आजच्या आंदोलनाचा परिणाम काय होईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) केलेल्या ट्वीटनुसार, "ध्रुव राठी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हुकूमशहाला अशा तरुणांची प्रचंड भीती वाटते, जे त्याच्या चुकीच्या कृत्यांवर प्रश्न उपस्थित करतात आणि गप्प राहण्यास नकार देतात!" या तीव्र भाषेतील वक्तव्यातून ही कारवाई त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकेमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
CJP Protest LIVE Updates: कॉकरोच जनता पार्टी (CJP) शनिवारी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या कार्यक्रमाला शक्य तितक्या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. सीजेपीने आधीच अनेक प्रमुख व्यक्तींचा पाठिंबा मिळवला आहे. आंदोलनाच्या शक्यतेने सरकार सतर्क आहे. दिल्लीला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आली आहेत.