
Comedian Kunal Kamra video on Indian Railways' plight and privatization target modi government
Kunal Kamara on Indian Railways : मुंबई : भारतामध्ये सर्वात मोठे सरकारी क्षेत्र म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. अंतर्गत भारतातील प्रवास हा रेल्वेने जोडला गेला आहे. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती हा प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतो. मुंबई सारख्या शहरामध्ये तर लोकल ही चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लाखो लोक दररोज रेल्वे प्रवास करत असताना सरकारकडून याच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप कॉमेडियन कुणाल कामरा याने केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
कॉमेडियन कुणाल कामरा याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर रेल्वेच्या कारभारावर टीकास्त्र डागले. व्हिडीओच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदींच्या भाषणातला अंश आहे ज्यात मोदी सांगतात २०१४ च्या आधी रेल्वेची काय अवस्था होती. यानंतर कुणाल कामराने मोदी सरकारवर निशाणा साधला. कुणाल कामरा म्हणाला की, रेल्वे आणि आपलं जुनं नातं आहे. कुणी प्लॅटफॉर्मवर अश्रू ढाळले आहेत. मध्यमवर्गीयासाठी तर ट्रेन हा नॉस्टेलजिया आहे. पण प्रश्न असा आहे की विकासाच्या रुळावर रेल्वे धावते आहे का? की नॉस्टेलजियाच्या डॉकयार्डला दीर्घकाळ उभी आहे? असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे कुणाल कामरा म्हणाला की, रेल्वेचा कायापालट करण्याचे काम २०१४ नंतर सुरु झाले त्याआधी कुणाला या प्रश्नाबाबत काहीही पडलेले नव्हतं. मग हाय स्पिड ट्रेनचा विचार कशाला करतील? २०२३ मध्ये रेल्वेचे २५ हजार अपघात झाले ज्यात २२ हजार लोकांचा मृत्यू झाला. पण रेल्वेच्या रिपोर्टनुसार ही संख्या कमी झाले आहेत असं म्हणणं आहे. ट्रेन घसरणं अगदीच सामान्य झालं आहे. रेल्वे बोर्डाचा २०२१ चा अहवाल हे सांगतो की २०१४ मध्ये रेल्वेच्या सुरक्षा योग्य प्रकारे नव्हत्या अस कुणाल कामराने सांगितले. दर दहा दिवसात रेल्वेचा एक अपघात होतो आहे, अशी आकडेवारी कुणाल कामरा याने मांडली.
All steps are being taken to make Indian Railways Private – https://t.co/dMNc5whvUQ pic.twitter.com/HYLcBhtMMk — Kunal Kamra (@kunalkamra88) November 19, 2025
नोकरीच्या संधींबाबत गंभीर आरोप?
देशात युवक बेरोजगार आहेत. रेल्वेत नोकरीच्या संधी आहेत पण ती पदं अद्याप रिक्त आहेत. बालासोर अपघाताच्या वेळी रेल्वेच्या ३ लाख १२ हजार जागा भरणं बाकी होतं. मार्च २०२४ पर्यंत रेल्वेच्या सुरक्षा विभागात १ लाख ५ हजार रिक्त जागा आहेत. ट्रेन ड्रायव्हर्स, ट्रेन कंट्रोलर्स, कू कंट्रोर्टस, पॉईंट्स मेन अशा जागा रिक्त आहेत. अशा महत्त्वाच्या जागा रिक्त असणं हा एक प्रकारे धोकाच आहे. सरकारच्या प्राथमिकतेत सामान्य माणसं सर्वात नीचांकी तळाला आहेत. २०२४ मध्ये रेल्वे मंत्र्यानी सांगितलं की दीड लाख कर्मचा-यांची नोकरीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण तरीही प्रत्यक्षात लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे असा दावा कुणाल कामराने केला आहे.
लोको पायलट्सची बिकट अवस्था?
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरवर्षी किमान ४०० ट्रॅक मेंटेनर्सचा मृत्यू
कुणाल कामरा पुढे म्हणाला,” ३ जून २०२४ ला लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट दोघांना डुलक्या लागल्या होत्या जे खाली पडले. त्याची सातत्याने चौथी नाईट ड्युटी होती. १२ नाईट ड्युटी सलग करणारेही लोको पायलट आहेत. त्यांना झोप मिळत नाही कारण कामाचा ताण आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असाही आरोप कुणाल कामराने केला. अतिरिक्त स्टाफ नाहीये. त्यांना सुट्ट्या मिळत नाहीत. ट्रॅक मेंटेनर्स हे मोठे नेटरवर्क कव्हर करतात. पण दरवर्षी किमान ४०० ट्रॅक मेंटेनर्सचा मृत्यू होतो. कारण हे लोक दिवसा समूहाने काम करतात आणि रात्री त्यांना एकट्याला पाठवले जाते. ट्रॅकची देखभाल करणारे लोक रोज १५ किलो तरी वजन उचलून चालत असतात, त्यांची मॉर्निंग शिफ्ट संध्याकाळी ४ किंवा ५ वाजता संपते त्यानंतर १० वाजता त्यांना नाईट शिफ्ट्सना बोलवलं जातं. त्यांचीही झोप पूर्ण होत नाही आणि अपघात होतात,” असा आरोप कुणाल कामराने केला आहे. रेल्वे हा भारतीय व्यवस्थेचा कणा आहे मोदी सरकारने त्याचं कंबरडे मोडलं आहे असा आरोप कुणाल कामराने केला आहे. तसंच ही वाटचाल रेल्वेच्या खासगीकरणाच्या दृष्टीने सुरु असल्याचंही त्याने म्हटले आहे.