राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यामध्ये संसदेच्या आवारात वाद झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने राजकीय तणाव वाढला. वैयक्तिक टिप्पणी आणि दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने संसदीय शिष्टाचार वाद यावर चर्चा सुरु झाली आहे. संसदेच्या आवारामध्ये विरोधकांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत होते. यावेळी राहुल गांधी यांनी नरवणे यांचे पुस्तक थेट संसदेमध्ये आणले आणि हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देणार असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
बुधवारी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्याशी वाद झाला. यावेळी संसद परिसरात तणाव निर्माण झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बिट्टूकडे वळले आणि म्हणाले, “हॅलो… मेरे गद्दार दोस्त. काळजी करू नकोस, तू परत येशील.” राहुल गांधींची ही टिप्पणी रवनीत बिट्टू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या संदर्भात होती. बिट्टू पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते.
राहुल गांधी यांनी टीका करताना “गद्दार” हा शब्दाचा वापर केल्यावर रवनीत बिट्टू यांनी तीव्र जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी थेट राहुल गांधींना “राष्ट्राचे शत्रू” असे संबोधले. गोंधळादरम्यान, राहुल गांधींनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, परंतु केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे नकार देत आपली नाराजी व्यक्त केली.
आज अगर प्रधानमंत्री संसद में आते हैं, तो मैं उन्हें एक किताब भेंट करूंगा। यह किताब किसी विपक्षी नेता की नहीं है।
यह किताब किसी विदेशी लेखक की नहीं है।
यह किताब है देश के पूर्व सेना प्रमुख जनरल नरवणे की – और हैरानी की बात यह है कि यह किताब कैबिनेट मंत्रियों के हिसाब से मौजूद ही… pic.twitter.com/xKzh0wPdni — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2026
हे देखील वाचा : ‘ट्रेड-डीलचा शेतकऱ्यांना फायदा…’,भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत पियुष गोयल यांचे मोठे विधान
विरोधी पक्षांचे निदर्शने आणि खासदारांचे निलंबन
भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने करत असताना वाद निर्माण झाला. त्यांनी “पंतप्रधानांशी तडजोड झाली आहे” अशा घोषणा लिहिलेले पोस्टर हातात धरले होते. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनीही असेच आरोप केले होते. या राजकीय संघर्षात खासदारांच्या निलंबनाचाही समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपाखाली मंगळवारी आठ विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले. निलंबित खासदारांमध्ये गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि बी. माणिकम टागोर यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांना चीन मुद्द्यावर बोलण्यापासून रोखण्यात आल्याने सोमवारी दुपारपासून सभागृहात गोंधळ सुरू आहे.






