Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिद्ध मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?…’; राहुल गांधींची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूकीचा निकाल दोन दिवसांमध्ये लागणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 02, 2024 | 02:15 PM
‘सिद्ध मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?…’; राहुल गांधींची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळत असल्याचे अनेक एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये देशातील सर्व विरोधकांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आणि एनडीए आघाडीला जोरदार टक्कर दिली. यानंतर आता एनडीए आघाडी 400 पारचे ध्येय गाठणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हा मोदी मीडिया पोल 

राहुल गांधी यांना माध्यमांनी दिल्लीमध्ये गाठले. यावेळी त्यांनी एक्झिट पोलमध्ये आलेल्या निकालावर प्रश्न विचारले यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी पहिल्यांद एक्झिट पोलबाबत आपले मत स्पष्ट केले. राहुल गांधी म्हणाले, याचे नाव एक्झिट पोल नाही तर त्याचे नाव मोदी मीडिया पोल आहे. हा मोदीजींचा कौल आहे. हा त्यांचा काल्पनिक कौल आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच राहुल गांधींना इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही सिद्ध मूसवालाचे गाणे ऐकले आहे… आम्हाला 295 जागा मिळत आहेत.” असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.

कॉग्रेसचे ट्वीट

ये एग्जिट पोल नहीं है। ये ‘मोदी-मीडिया’ पोल है। INDIA गठबंधन की 295 सीटें आ रही हैं। : @RahulGandhi जी pic.twitter.com/alETKjG3SO — Congress (@INCIndia) June 2, 2024

[blurb content=””]
इंडिया आघाडीचा किती जागांचा अंदाज?

इंडिया आघाडीने एनडीए आघाडीला जोरदार चुरशीची लढत दिल्यामुळे इंडिया आघाडीकडून विजयाचा विश्वास व्यक्त केले जात आहे. तसेच इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक देखील पार पडत आहे. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा केला होता. नेत्यांशी आणि जनतेत चर्चा झाल्याने इंडिया आघाडीला 295 पेक्षा जास्त जागा मिळतील असे आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो,’ असे खर्गे देखील म्हणाले आहेत.

Web Title: Congress leader rahul gandhi gives reaction on loksabha election result exit poll 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2024 | 02:06 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
1

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
2

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
3

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका
4

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.