Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : अमित शहांच्या विधानावर राहुल गांधींचा पलटवार; म्हणाले, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये म्हणून भाजप…

गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये यासाठी भाजप आणि आरएसएसचा डाव असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. अमित शहांनी याबाबत वक्तव्य केलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 20, 2025 | 05:27 PM
अमित शहांच्या विधानावर राहुल गांधींचा पलटवार; म्हणाले, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये म्हणून भाजप...

अमित शहांच्या विधानावर राहुल गांधींचा पलटवार; म्हणाले, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये म्हणून भाजप...

Follow Us
Close
Follow Us:

इंग्रजी केवळ एक बांध नाही तर पूल आहे. इंग्रजी ही शक्ती आहे. इंग्रजी म्हणजे बेड्या नव्हेत तर बेड्या तोडणारं हत्यार आहे. त्यामुळेच गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये यासाठी भाजप आणि आरएसएसचा डाव असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक काळ असा येईल की इंग्रजीची लाज वाटेल असं व्यक्तव्य केलं आहे. त्याला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं.

Amit Shah : “इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल…”, भाषेच्या वादात अमित शहांचे मोठे विधान

केंद्र सरकारने भाषात तिसऱ्या भाषेचा पर्याय आणला आहे. हिंदी भाषा सर्व राज्यांमध्ये तिसरी भाषा म्हणून अभ्यासक्रम आणि प्रशासकीय कामकाजात वापरात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दक्षिणेतील राज्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात ५ वीपासून अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, त्यामुळे राजकीय घमासान सुरू आहे.

राहुल गांधींनी नक्की काय म्हटलंय?

राहुल गांधींनी एक्स वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, इंग्रजी फक्त एक बांध नाही तर जगाशी जोडणारा पूल आहे. इंग्रजी ही लाज नाही तर शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही तर साखळदंड तोडण्याचं हत्यार आहे. त्यामुळे भाजप आणि आरएसएसला गरीब मुलांनी इंग्रजी शिकावे असं वाटत नाही. गरिबांच्या मुलांनी शिकून पुढे जावं, समानतेने राहावं असं त्यांनी वाटत नाही. आजच्या काळात, इंग्रजी तुमच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. कारण इंग्रजी भाषा रोजगार देईल आणि आत्मविश्वास वाढवेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारतातील प्रत्येक भाषेत एक आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांची कदर केली पाहिजे. पण इंग्रजीही तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे ती शिकली पाहिजे. जगाशी स्पर्धा करणाऱ्या भारताकडे हाच मार्ग आहे, जो प्रत्येक मुलाला समानतेची संधी देतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल यांनी पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. इंग्रजी हे एक शस्त्र आहे. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही जगात कुठेही प्रवास करू शकता. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही अमेरिका, जपान आणि इतर कुठेही जाऊ शकता. तुम्ही कुठेही काम करू शकता. जे इंग्रजीच्या विरोधात आहेत त्यांना तुम्हाला कोट्यवधी रुपयांची नोकरी मिळावी असं वाटत नाही. विदेशातील दारं तुमच्यासाठी बंद ठेवण्याचा हा डाव असल्याची टीका राहुल गांधी यांनी केला आहे.

Bihar Election : बिहार निवडणुकांसाठी NDA चा मास्टर प्लान ठरला; या नेत्याच्या नेतृत्वात लढणार निवडणूक

अमित शाह नक्की काय म्हणाले होते?

लवकरच भारतात असा काळ येईल की इंग्रजी भाषिकांना लाज वाटेल. अशा समाजाची निर्मिती आता दूर नाही. तुम्ही तुमची संस्कृती, धर्म आणि इतिहास कोणत्याही परदेशी भाषेत समजू शकत नाही. आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. २०४७ मध्ये भारत जगात अव्वल स्थानावर येण्यात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील, असं विधान केलं होतं.

 

Web Title: Congress leader rahul gandhi reaction on elnglish language amit shah statment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Hindi Language
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
1

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला
2

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
3

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक…: लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांवर कोणी केला आरोप?
4

राहुल गांधी हे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक…: लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांवर कोणी केला आरोप?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.