Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी लतीफ भटचा खात्मा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले सुरक्षा दलाचे कौतुक

कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा करण्यात आला. या कारवाईनंतर अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांचे कौतुक केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2026 | 04:03 PM
Amit Shah reaction on Kulgam Encounter Latif Bhat

Amit Shah reaction on Kulgam Encounter Latif Bhat

Follow Us
Follow Us:
  • लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा 
  • गृहमंत्री अमित शाह यांनी केले सुरक्षा रक्षकांचे कौतुक
  • जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय असलेला शेवटचा स्थानिक दहशतवादी
Amit Shah on Kulgam Encounter Latif Bhat : श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईला यश मिळाले आहे. यावेळी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीनंतर घटनास्थळावरून लतीफ भट याचा मृतदेह आणि एक शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलाचे कौतुक केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर (ट्वीटर) पोस्ट शेअर करत या मोहिमेबद्दल सुरक्षा रक्षकांचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय असलेला शेवटचा स्थानिक दहशतवादी लतीफ भट याला सुरक्षा दलांनी ठार केले, असे त्यांनी म्हटले. पोलिस, लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये झालेल्या उत्तम समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे शाह यांनी नमूद केले.

अमित शाह यांनी लिहिले, जम्मू-काश्मीर पोलीस (JKP), भारतीय लष्कर, सीआरपीएफ (CRPF) आणि गुप्तचर संस्थांच्या समन्वित प्रयत्नांतून, खोऱ्यातील लष्कर-ए-तैयबाचा शेवटचा सक्रिय स्थानिक दहशतवादी ‘लतीफ भट’ याला आज पहाटे कुलगाममध्ये राबवलेल्या एका मोहिमेदरम्यान ठार करण्यात आले. त्याच्यासोबत असलेला आणखी एक दहशतवादी, उमर निसार, यालाही आदल्या दिवशी कुलगाममध्येच ठार करण्यात आले होते. ही संपूर्ण मोहीम अत्यंत उच्चस्तरीय समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली.

Terrorist Latif Bhat Encounter: लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर लतीफ भटचा खात्मा; जंगलपोरामध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी कारवाई

कुलगाम जिल्ह्यातील जंगलपोरा येथे पोलिसांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत मशिदीत लपून बसलेल्याला ठार करण्यात आले आहे. मृत दहशतवाद्याची ओळख कुलगाम जिल्ह्यातील खेरवान येथील रहिवासी मोहम्मद लतीफ भट अशी झाली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान

‘सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले’

जेडीयू जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष जी. एम. शाहीन यांनी लतीफ भटच्या खात्म्याचे स्वागत करत ही मोठी कामगिरी असल्याचे म्हटले. सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेपलीकडून दहशतवाद पसरविणाऱ्यांना कोणतेही स्थान नाही, असेही शाहीन यांनी  सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुलगाममध्ये ठार झालेला दहशतवादी कोण होता?

    Ans: कुलगाममधील खेरवान येथील रहिवासी मोहम्मद लतीफ भट हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • Que: लतीफ भटविरोधातील कारवाईत कोण सहभागी होते?

    Ans: जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

  • Que: लतीफ भट ठार होताच अमित शाहांनी काय म्हटले?

    Ans: अमित शाह यांनी सुरक्षा दलांच्या समन्वयाचे कौतुक करत जवानांना सलाम केला.

Web Title: Home minister amit shah reaction on kulgam encounter lashkar commander latif bhat killed nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Amit Shah
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!
1

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव
2

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
3

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
4

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.