
congress mp rahul gandhi making sweet in delhi shop for diwali 2025
Rahul Gandhi Diwali Celebration: नवी दिल्ली: संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात दीपावलीचा सण साजरा केला जात आहे. सर्वत्र दिव्यांची उजळून करुन मिठाई खात आनंद व्यक्त केला जात आहे. दिवाळीच्या सणामध्ये कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांनी देशवासियांना देखील दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर स्वतः मिठाई बनवून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खासदार राहुल गांधी हे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन सणांचा आनंद घेताना दिसून येतात. राहुल गांधी हे अनेकदा बाजारपेठांमध्ये थेट जाऊन लोकांची विचारपूस करतात. यावेळी देखील खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या लोकप्रिय मिठाईच्या बाजारपेठमध्ये जाऊन दिवाळीच्या आनंद घेतला. त्यांनी जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मिठाईच्या दुकान घंटेवाला स्वीट शॉपला भेट देऊन दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली.
खासदार राहुल गांधी मिठाईच्या दुकानात जिलेबी आणि बेसनाचे लाडू बनवतानाही दिसले. राहुल गांधींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अनोख्या दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील पोस्ट केला, ज्यामध्ये ते मिठाईच्या दुकानाच्या मालकाशी संवाद साधताना दिसत आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या मिठाईच्या दुकानातील व्हिडिओ शेअर करताना खासदार राहुल गांधींनी लिहिले आहे की, जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानात इमरती आणि बेसन लाडू बनवण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतके जुन्या, प्रतिष्ठित दुकानाची गोडवा तशीच आहे – शुद्ध, पारंपारिक आणि हृदयस्पर्शी.दिवाळीची खरी गोडवा केवळ ताटात नाही तर नातेसंबंध आणि समुदायात देखील आहे.आम्हाला सांगा, तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि ती खास कशी बनवत आहात? असे राहुल गांधींनी सामान्य भारतीयांना विचारले.
पुरानी दिल्ली की मशहूर और ऐतिहासिक घंटेवाला मिठाइयों की दुकान पर इमरती और बेसन के लड्डू बनाने में हाथ आज़माया। सदियों पुरानी इस प्रतिष्ठित दुकान की मिठास आज भी वही है – ख़ालिस, पारंपरिक और दिल को छू लेने वाली। दीपावली की असली मिठास सिर्फ़ थाली में नहीं, बल्कि रिश्तों और समाज… pic.twitter.com/bVWwa2aetJ — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 20, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुकान मालकांना राहुल गांधींच्या लग्नाची प्रतिक्षा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान एक मनोरंजक घटना घडली. जुन्या दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाच्या मालकाने दिवाळीनिमित्त राहुल गांधींना भेटताना सांगितले की आता सर्वजण त्यांच्या (राहुल गांधींच्या) लग्नाची वाट पाहत आहेत. मिठाईच्या दुकानाच्या मालकाने राहुल गांधींना लवकरच लग्न करण्याचा आग्रह केला. राहुल गांधींनी या वैयक्तिक विनंतीला प्रतिसाद दिला नाही आणि फक्त हसले. या व्हिडिओमध्ये, मिठाईच्या दुकानाच्या मालकाने आपला मुद्दा स्पष्ट करत म्हटले आहे की, “आम्ही तुमचे आजोबा जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांना सुद्धा मिठाई खाऊ घातली आहे.