Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025 : कॉंग्रेसचे मिशन बिहार! पक्षाच्या बळकटीसाठी 58 पर्यवेक्षकांची केली नियुक्ती

यंदाच्या वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. 58 निरिक्षकांची यादी कॉंग्रेसने जाहीर केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 30, 2025 | 04:57 PM
Congress President Mallikarjun Kharge releases list of 58 observers for Bihar Assembly Elections 2025

Congress President Mallikarjun Kharge releases list of 58 observers for Bihar Assembly Elections 2025

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याच  पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष एक्शनमोडमध्ये आला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारमध्ये पक्षच्या बळकटीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस मुख्यालयातून जाहीर झालेल्या निरीक्षकांच्या यादीत निवृत्त विंग कमांडर यांच्यासह 58 नेत्यांची नावे आहेत.

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावलेले महागठबंधन यंदाच्या निवडणूकीमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत, ‘ महागठबंधन’चा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या राजदने 144 जागा लढवल्या होत्या आणि 75 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 70 जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु केवळ 19 जागांवर विजय मिळवला. या आघाडीचा आणखी एक मित्रपक्ष असलेला, सीपीआय (एमएल) लिबरेशनने 19 जागा लढवत 12 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणूक निकालामुळे बिहारमधील काँग्रेसच्या तयारीवर आणि कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळेच यावेळी काँग्रेस निवडणुकीत आपले अस्तित्व मजबूतपणे दाखविण्याची तयारी करत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये केलेल्या 58 निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अभिनंदन केले आहे. बिहार काँग्रेसने सोशल मीडियावर निरीक्षकांची यादी देखील शेअर केली. यावेळी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांना एआयसीसी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली आहे. बिहार काँग्रेस परिवारातील तुम्हा सर्व आदरणीय सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.”

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बिहारमध्ये ‘सुपर 58’ निरिक्षक नियुक्त करताना काँग्रेसने राजकीय समीकरणेही लक्षात ठेवली आहेत. या यादीत सर्व विभागातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ओबीसी, एससी, अल्पसंख्याक तसेच उच्च जातीतील नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. या पथकाबाबत असे मानले जाते की, विधानसभा मतदारसंघांनुसार या लोकांना जबाबदारी दिली जाईल. हे सर्व ५८ निरीक्षक स्थानिक कामगारांशी संवाद साधतील आणि जमिनीवरील वास्तवाचे मूल्यांकन करतील. यासोबतच, आम्ही विधानसभेपासून ते बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत करू. आता हे पथक पक्षासाठी किती आणि काय काम करू शकते हे पाहणे बाकी आहे.

माननीय कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge जी ने बिहार में आगामी विधानसभा चुनावों के लिए निम्नलिखित पार्टी पदाधिकारियों को एआईसीसी पर्यवेक्षकों के रूप में नियुक्त करने के प्रस्ताव को तत्काल प्रभाव से मंजूरी दे दी है।

आप सभी सम्मानित साथियों को बिहार कांग्रेस परिवार की ओर से हार्दिक… pic.twitter.com/5TawkRFP35

— Bihar Congress (@INCBihar) June 29, 2025

या यादीमध्ये निवृत्त विंग कमांडर अनुमा आचार्य, मेहंदी, अशोक चंदना, मनोज यादव, नदीम जावेद, शोएब खान, अखिलेश यादव, वीरेंद्र यादव अशा  नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर अजित भारतीय, अली मेहंदी, आरिफ मसूद, अरुण विद्यार्थी, अशोक चंदना, भुवनेश्वर बघेल, दीन बंधू बोईपाई, धीरेश कश्यप, देवेंद्र सिंह राजपूत आणि देवेंद्र निषाद यांचा समावेश आहे. कॉंग्रेसने सर्व निरिक्षकांची यादी जाहीर केली आहे.

Web Title: Congress president mallikarjun kharge releases list of 58 observers for bihar assembly elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Congress
  • Mallikarjun Kharge

संबंधित बातम्या

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
1

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
2

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
3

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…
4

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.