Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

MGNREGA योजनेचे नवीन नाव VB–G RAM G असे ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 19, 2025 | 12:22 PM
Congress Rahul Gandhi aggressive after the name of the MGNREGA scheme was changed to VB-G RAM G

Congress Rahul Gandhi aggressive after the name of the MGNREGA scheme was changed to VB-G RAM G

Follow Us
Close
Follow Us:
  • MGNREGA योजनेचे नवीन नावातून महात्मा गांधींचा उल्लेख नाही
  • VB–G RAM G विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधक आक्रमक
  • राहुल गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
MGNREGA Name Change : नवी दिल्ली : सध्या दिल्लीच्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विविध विषयांवरुन सत्ताधारी आणि झाला आहे. विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन वाद निर्माण त्याचबरोबर MGNREGA योजनेच्या नामांतरावरुन गदारोळ सुरु आहे. MGNREGA योजनेचे नवीन नाव VB–G RAM G असे ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडी राम नामाचा जप सुरु राहिल. योजनेमधून महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) नाव हटवल्यामुळे कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले असून यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन या विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “काल रात्री, मोदी सरकारने एकाच दिवसात मनरेगाचे वीस वर्षांचे काम उद्ध्वस्त केले. VB–G RAM G हा मनरेगाचा ‘पुनर्रचना’ नाही. तो हक्कांवर आधारित, मागणी-आधारित हमी योजना संपुष्टात आणत आहे आणि तिचे रूपांतर दिल्लीतून नियंत्रित होणाऱ्या शिधावाटप योजनेत करतीये. ही योजना मुळातच राज्यविरोधी आणि गावांविरोधी आहे. मनरेगामुळे ग्रामीण मजुरांना सौदेबाजीची शक्ती मिळाली. खऱ्या अर्थाने पर्याय उपलब्ध झाल्यामुळे, शोषण आणि पोटापाण्यासाठी होणारे स्थलांतर कमी झाले, मजुरी वाढली, कामाच्या परिस्थितीत सुधारणा झाली, आणि त्याच वेळी ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती व पुनरुज्जीवन झाले. नेमकी हीच शक्ती हे सरकार नष्ट करू इच्छिते,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

हे देखील वाचा : रविंद्र धंगेकरांची ‘ती’ भूमिका भाजपला खटकली? पुण्यात भाजप-शिवसेनेच्या बैठकीला बोलावलंच नाही

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “कामावर मर्यादा घालून आणि काम नाकारण्याचे अधिक मार्ग तयार करून, VB–G RAM G ग्रामीण गरिबांकडे असलेले एकमेव साधन कमकुवत करत आहे. कोविडच्या काळात मनरेगाचे महत्त्व आपण पाहिले. जेव्हा अर्थव्यवस्था ठप्प झाली आणि उपजीविका कोलमडली, तेव्हा या योजनेने कोट्यवधी लोकांना उपासमार आणि कर्जाच्या खाईत लोटले जाण्यापासून वाचवले. आणि याचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला – वर्षानुवर्षे, महिलांनी एकूण कामाच्या दिवसांपैकी निम्म्याहून अधिक योगदान दिले आहे. जेव्हा तुम्ही रोजगार कार्यक्रमात शिधावाटप पद्धत लागू करता, तेव्हा महिला, दलित, आदिवासी, भूमिहीन मजूर आणि सर्वात गरीब ओबीसी समुदायांनाच सर्वात आधी बाहेर ढकलले जाते.”

हे देखील वाचा : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

“या सर्वांवर कळस म्हणजे, हा कायदा संसदेत योग्य छाननीशिवाय रेटून मंजूर करण्यात आला. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली. ग्रामीण सामाजिक करारात बदल करणाऱ्या आणि कोट्यवधी कामगारांवर परिणाम करणाऱ्या कायद्याला गंभीर समिती छाननी, तज्ञांचा सल्ला आणि सार्वजनिक सुनावणीशिवाय कधीही रेटून मंजूर केले जाऊ नये. पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट स्पष्ट आहे: श्रमिकांना कमकुवत करणे, ग्रामीण भारताची, विशेषतः दलित, ओबीसी आणि आदिवासींची शक्ती कमी करणे, सत्ता केंद्रीकृत करणे आणि नंतर ‘सुधारणा’ म्हणून घोषणा विकणे आहे,” असा आरोप कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

मनरेगा हा जगातील सर्वात यशस्वी दारिद्र्य निर्मूलन आणि सक्षमीकरण कार्यक्रमांपैकी एक आहे. आम्ही या सरकारला ग्रामीण गरिबांच्या संरक्षणाची ही शेवटची भिंत नष्ट करू देणार नाही. आम्ही कामगार, पंचायती आणि राज्यांसोबत उभे राहून या निर्णयाचा पराभव करू आणि हा कायदा मागे घेतला जाईल याची खात्री करण्यासाठी देशव्यापी आघाडी उभारू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Last night, the Modi government demolished twenty years of MGNREGA in one day. VB–G RAM G isn’t a “revamp” of MGNREGA. It demolishes the rights-based, demand-driven guarantee and turns it into a rationed scheme which is controlled from Delhi. It is anti-state and anti-village… — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 19, 2025

Web Title: Congress rahul gandhi aggressive after the name of the mgnrega scheme was changed to vb g ram g

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • MGNREGA
  • Modi government
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

MGNREGA Name Change : महात्मा गांधी आणि बापूंसोबत नाही राहिला आता संबंध; मनरेगा आता झाले राम नाम
1

MGNREGA Name Change : महात्मा गांधी आणि बापूंसोबत नाही राहिला आता संबंध; मनरेगा आता झाले राम नाम

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
2

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

VB-G RAM-G Bill passed : लोकसभा आहे की कुस्तीचा आखाडा? VB-G RAM-G बिल पास होताच खासदारांनी केली फेकाफेकी
3

VB-G RAM-G Bill passed : लोकसभा आहे की कुस्तीचा आखाडा? VB-G RAM-G बिल पास होताच खासदारांनी केली फेकाफेकी

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल
4

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.