पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत चर्चा; मात्र धंगेकरांना निमंत्रणच नाही (संग्रहित फोटो)
पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानुसार, सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना या चर्चेतून डावलण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आजच्या बैठकीचे त्यांना आमंत्रण नसल्याचे बोलले जात आहे.
भाजप-शिवसेना बैठक पार पडली. या बैठकीत मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, धीरज घाटे, नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे उपस्थित होते. पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात चर्चा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीचे निमंत्रण भाजपने भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिले, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. तर शिवसेनेने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिली. पण, धंगेकरांना शिवसेनेचं निमंत्रण दिले नाही. त्यामुळे शिंदे गटाकडूनच दूरावा होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेदेखील वाचा : BMC Election 2026: मुंबई महापालिकेत ‘धनुष्यबाण’ हाती घेण्यासाठी चढाओढ! २२७ जागांसाठी २७०० हून अधिक महिलांची विक्रमी उपस्थिती
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यानच्या काळात रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर काही काळ शांत होते. मात्र, जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता.
बैठकीसाठी आमंत्रण नाही
पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागांच्याबाबत भाजप आणि शिवेसना यांच्यातील चर्चेला सुरुवात झाली. मात्र, या पक्षाच्या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण देण्यात आले नाही. काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्याकडे शिवसेनेचे पुणे शहराचे महानगरप्रमुखपद देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान ! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’






