Photo Credit- Social Media
पुंछ: जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील एका गावात रविवारी (15 सप्टेंबर) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत एका मोठ्या दहशतवादी संघटनेचा कमांडर तेथे अडकल्याचे माहिती समोर आली आहे.
तेथील एका दुर्गम गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलीस आणि लष्कराने शनिवारी संध्याकाळी मेंढर उपविभागातील गुरसाई टोपजवळील पठाणीर भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. एक संयुक्त पथक दहशतवाद्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर दोघांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा: ‘संविधान बदला’च्या नॅरेटिव्हची धास्ती; दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा नवा प्ल्रॅन
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, किश्तवाडमधील दाछन भागातही सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले.
आज झालेल्या चकमकीपूर्वी 14 सप्टेंबरला , केंद्रशासित प्रदेश (UT) असलेल्या बारामुल्ला येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर संजय कन्नोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांच्या माहितीवरून सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील चक टप्पर क्रिरीमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. रिकाम्या इमारतीत दहशतवाद्यांनी आमच्या जवानांवर गोळीबार केला. नंतर घेराव घालून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे “मोठे यश” असल्याचे सांगितले.
हेही वाचा: आनंदाश्रमात नोटांचा वर्षाव; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
दरम्यान, लष्कराच्या जवानांनी शनिवारी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, या घटनेत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात ही चकमक झाली जेव्हा नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका गटाला रोखले.
#WATCH | J&K | Encounter is underway between security forces and terrorists in the Pathanateer area of the Mendhar sector of Poonch after rounds of fire were heard last night. Gunshots can be heard in the background.
(Visuals deferred by unspecified time) https://t.co/M2OUKNqQD2 pic.twitter.com/ReZZs1DttD
— ANI (@ANI) September 15, 2024
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका
केंद्रशासित प्रदेशात आगामी काळात होणारे महत्त्वाचे कार्यक्रम पाहता, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आणि सुरक्षा दलांसाठी उल्लेखनीय यश आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. जम्मू विभागातील डोडा, किश्तवाड, रामबन, रियासी, पुंछ, उधमपूर, कठुआ, जम्मू आणि सांबा जिल्ह्यात 25 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील आणि 1 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
हेही वाचा: लेडी-डॉक्टर ऐटीत बसलेली अन् बाप्पाच्या हातात फासावर लटकवलेला आरोपी,