कोविडबाधितांचा आकडा ७००० वर, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांना भेटण्यासाठी RT-PCR अनिवार्य
देशात पुन्हा एकदा कोविड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. सध्या देशात 7,000 हून अधिक सक्रिय रुग्ण असून, मागील 24 तासांमध्ये 306 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटणाऱ्या सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
आज सायंकाळी दिल्लीतील जवळपास 70 भाजप नेते, मुख्यमंत्री, सात खासदार व आमदार पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर ही भेट होणार आहे. या सर्व नेत्यांची RT-PCR चाचणी केली जाणार आहे.
गुजरात
सक्रिय रुग्ण – 1223
24 तासांत नवीन रुग्ण – 114
मृत्यू – 2
कर्नाटक
सक्रिय रुग्ण – 459
24 तासांत नवीन रुग्ण – 100
एकूण मृत्यू – 11
24 तासांत मृत्यू – 2
केरळ
सक्रिय रुग्ण – 2223
24 तासांत नवीन रुग्ण – 170
एकूण मृत्यू – 19
24 तासांत मृत्यू – 3
महाराष्ट्र
सक्रिय रुग्ण – 615
24 तासांत नवीन रुग्ण – 2
एकूण मृत्यू – 19
24 तासांत मृत्यू – 1
पश्चिम बंगाल
सक्रिय रुग्ण – 747
24 तासांत नवीन रुग्ण – 0
एकूण मृत्यू – 1
24 तासांत मृत्यू – 0
बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सडलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश,आतड्या होतील स्वच्छ
कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असतानाच, केंद्र सरकारने देशभरातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल सुरू केली आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन, आइसोलेशन बेड्स, व्हेंटिलेटर आणि औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. राज्य सरकारांना योग्य ती तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, बहुतेक रुग्णांचे लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत, पण खबरदारी म्हणून निगराणी आणि उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनीदेखील स्वतःची काळजी घेणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घेणे गरजेचं आहे.