रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
कोलेस्ट्रॉल हा आरोग्यासाठी घातक आहे. या सायलेंट किलर आजाराची लक्षणे खूप उशिरा दिसून येतात.यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. चुकीचा आहार, तिखट तेलकट पदार्थांचे सेवन, शरीरात वाढलेला कामाचा तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल निरोगी पेशी तयार करते. तर वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवण्याची जास्त शक्यता असते. शरीरात साचून राहिलेला चिकट पिवळा थर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो. यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम डोळ्यांवर सुद्धा दिसून येतो. यामुळे डोळ्यांच्या खाली पिवळे डाग दिसू लागतात. या स्थितीला झेंथेलास्मा असे सुद्धा म्हणतात. शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे चेहऱ्यावर अनेक समस्या दिसून येतात. चेहऱ्याचा रंग बदलणे किंवा पापण्यांच्या खाली पिवळे डाग दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये अनेक बदल दिसून येतात. डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये हलक्या गडद रंगाची वर्तुळ दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय डोळ्यांमध्ये सुद्धा खराब कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते.
शरीरात कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू लागतो. यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात वारंवार थकवा जाणवत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह योग्यरीत्या होत नसल्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते.
पोटावर लटकलेली चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरेल हे आयुर्वेदिक चूर्ण, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी