केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता, पण याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नव्हती. शिवाय, हा विवाह कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय करण्यात आला होता. त्यामुळे नियमभंगाच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून हटवण्यात आले आहे.
मुनीर अहमद यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वू पाकिस्तानच्या मीनल खान या नागरिकासोबत विवाह केला होता. विवाहानंतर मीनल खान व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि पुढे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपूनही ती भारतातच थांबली होती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. याच पार्श्वभूमीवर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत झाली होती. ती अटारी-वाघा सीमेवर असताना, त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या आदेशानंतर तिला पुन्हा सीमेवरून परत पाठवण्यात आले.
‘भारतासोबत मोठे युद्ध होणार नाही, पण…’ पाकिस्तानच्या माजी NSAने का केला असा दावा?
न्यूज एजन्सी ANI शी बोलताना जम्मूमधील पाकिस्तानी नागरिक मीनल खान यांचे वकील अंकुश शर्मा यांनी सांगितले की, मीनल सध्या हिंदुस्तानातच आहेत. त्यांनी सांगितले, “CRPF चा कॉन्स्टेबल मुनीर अहमद याने पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी लग्न केले होते. ती व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली होती आणि त्यानंतर तिने दीर्घकालीन (लाँग टर्म) व्हिसासाठी अर्ज केला होता.”
लाँग टर्म व्हिसासाठी अर्ज
शर्मा पुढे म्हणाले, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जारी केलेल्या आदेशात दोन प्रकारच्या लोकांना सूट देण्यात आली होती — एक म्हणजे राजनैतिक व्हिसाधारक, आणि दुसरे म्हणजे लाँग टर्म व्हिसाधारक. मीनल यांचा लाँग टर्म व्हिसाचा प्रक्रियेतील शेवटचा टप्पा सुरू होता आणि त्यांनी अंतिम मुलाखतही दिली होती. गृह मंत्रालयाकडे व्हिसा मंजुरीसाठी सकारात्मक शिफारसीही पाठवण्यात आल्या होत्या. दरम्यान, पहलगाम हल्ला झाला आणि त्यांच्या जवळ लाँग टर्म व्हिसा नसल्यामुळे त्यांना अटारी सीमेवर पाठवण्यात आले.”
अंकुश शर्मा यांनी सांगितले, “जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. त्यानंतर तिला परत जम्मूमध्ये पाठवण्यात आले. ती काल पहाटे सुमारे ३ वाजता जम्मूमध्ये पोहोचली.” CRPF ने जवान मुनीर अहमद याला एका पाकिस्तानी महिलेबरोबरचे लग्न लपवल्यामुळे सेवेतून बडतर्फ केले आहे. CRPF ने हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे मानले.