नवी दिल्ली: काल दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तता यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातील आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता काही महत्वाचे नरिणय घेण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेत आता मोठी वाढ तसेच महत्वाचा बदल केला जाणार आहे. आता ज्यावेळेस मुख्यमंत्री रेखा गुप्ता या जनसुनावणी घेतील, तेव्हा त्यांच्याभोवती सुरक्षेचे मोठे कडे असणार आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळ कोणी जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
जनसुनावणीदरम्यान येणाऱ्या नागरिकांची देखील आता तपासणी केली जाणार आहे. जनसुनावणीदरम्यान सीआरपीएफचे जवान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासाठी क्लोज प्रोटेक्शनमध्ये तैनात केले जाणार आहेत.मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या झेड प्लस सुरक्षेत कोणत्या प्रकारचा बदल करण्यात आला नाही. मुख्यमंत्री या पदावर असल्याने त्यांना झेड प्लेस सुरक्षा कायम असणार आहेच. मात्र आता ज्यावेल्स त्या जनसुनावणी घेतील त्यावेळेस त्यांच्या भोवती सुरक्षाररक्षकांचे कडे असणार आहे.
नेमके काय घडले होते?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला सकाळी ८:१५ च्या सुमारास झाला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख राजेशभाई खिमजीभाई साकरिया (वय ४१) अशी झाली असून, तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. तो तक्रारदार म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला होता. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “आम्ही सगळे बसलो होतो. ज्या व्यक्तीची पाळी आली, तो मुख्यमंत्र्यांसोबत बसला होता. तो त्यांच्याशी बोलत असताना अचानक त्याने त्यांच्यावर हल्ला केला. आम्हाला मोठा आवाज ऐकू आला आणि पोलिसांनी त्वरित त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.”
मुख्यमंत्र्यांची पोस्ट काय?
आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये रेखा गुप्ता यांनी म्हटले आहे की, “आज सकाळी जनसुनावणीदरम्यान माझ्यावर झालेला हल्ला हा फक्त माझ्यावर नाही, तर दिल्लीची सेवा करण्याच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या आमच्या संकल्पावर केलेला एक भ्याड प्रयत्न आहे. या हल्ल्यानंतर मी नक्कीच हादरले होते.
आज सुबह जनसुनवाई के दौरान मेरे ऊपर हुआ हमला केवल मेरे ऊपर नहीं, बल्कि दिल्ली की सेवा और जनता की भलाई के हमारे संकल्प पर किया गया एक कायराना प्रयास है।
स्वाभाविक है कि इस हमले के बाद मैं सदमे में थी, परन्तु अब बेहतर महसूस कर रही हूँ। मैं अपने सभी शुभचिंतकों से निवेदन करती हूँ कि…
— Rekha Gupta (@gupta_rekha) August 20, 2025
पण आता मला बरे वाटत आहे. माझ्या सर्व हितचिंतकांना माझी विनंती आहे की, कृपया मला भेटण्यासाठी गर्दी करू नका. मी लवकरच तुमच्यामध्ये काम करताना दिसेन.”