CM Devendra Fadnavis' reaction on Nagpur violence over Aurangzeb's tomb controversy
Delhi Assembly Election Result 2025: आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तब्बल 27 वर्षांनी भाजपचे कमळ दिल्लीत फुलले आहे. नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा देखील 4 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सीसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे. दरम्यान भाजपने 8 जागांवरून 48 जागांवर झेप घेतली आहे. दरम्यान भाजपने मिळवलेल्या यशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. दिल्लीच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. त्यांनी अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. आज पुण्यातून बोलताना फडणवीस यांनी दिल्लीतील विजयावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीच्या जनतेने विश्वास ठेवला.”
🕟 4.20pm | 8-2-2025📍Pune.
LIVE | Media interaction #Maharashtra #Pune https://t.co/nq3wtgeWZN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 8, 2025
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या विजयाने आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासने देऊन, लोकांना भुलवून ज्या प्रकारे त्यांनी राज्य केले, त्या परंपरेचा आज अंत झाला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे.
पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
लोकशक्ती सर्वोतोपरी! विकास जिंकला, सुशासन जिंकले..
दिल्लीतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल माझा प्रणाम आणि अभिनंदन. तुम्ही दिलेल्या भरपूर आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.
दिल्लीचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. हा आमचा विश्वास आहे. यासोबतच, विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची भूमिका महत्त्वाची राहील याचीही आम्ही खात्री करून घेऊ.
मला भाजपच्या विजयासाठी अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा खूप अभिमान आहे. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांची सेवा अधिक दृढतेने करण्यासाठी समर्पित राहू.
हेही वाचा: PM Narendra Modi: दिल्लीतील BJP च्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले, “आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. मी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेने ज्या अपेक्षेने भाजपला विजयी केले आहे, ते त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो.”
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “गेली 10 वर्षे जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही खूप कामे केली. आरोग्य , वीज, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात जनतेला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न केला. जनतेने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडू. लोकांच्या आनंदात, दुखा:त आम्ही सहभागी होऊ. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नव्हतो. तर आम्ही लोकांच्या सेवेसाठी राजकारण हे एक साधन समजत आलो आहोत.