दिल्लीत २७ वर्षांनी होणार भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आली आहे. दुपारी १२ वाजता राजधानीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. त्याआधी, सोमवारी (१७ फेब्रुवारी) भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल. केशव कुंज येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन १९ तारखेला होईल. संघ कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचे मुख्यमंत्री सहभागी होतील.
खरं तर, भाजपने सोमवारी (१७ फेब्रुवारी) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल. सर्व आमदारांना कळविण्यात आले आहे. ही बैठक दिल्ली राज्य कार्यालयात होईल. केशव कुंज येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन १९ तारखेला होईल. संघ कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचे मुख्यमंत्री सहभागी होतील. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ निवडणूक निकालानंतर दहा दिवसांनी होईल. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले, ज्याचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. मात्र, निवडणूक निकालानंतर आठवडा उलटूनही भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहिनुसार सोमवारी हे नाव हमखास जाहीर होणार आहे.
‘भेट घेतली तरी हेतू एकच’… धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
सोमवारी हटणार पडदा
सोमवारी (१७ फेब्रुवारी) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरील सस्पेन्स संपेल. सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल आणि पुढील पाच वर्षांसाठी दिल्लीची कमान कोणाकडे सोपवली जाईल हे स्पष्ट होईल.
विधानसभेनंतर भाजप आता ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता; जोरदार तयारीही सुरु
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार कोण आहेत?
वाढत्या अटकळांमध्ये, दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी पाच प्रमुख नावे समोर आली आहेत. यामध्ये नवी दिल्लीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा आणि कालकाजीमधून माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडून पराभूत झालेले रमेश बिधुरी यांचा समावेश आहे. भाजप खासदार मनोज तिवारी, कपिल मिश्रा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि विजेंदर गुप्ता यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली निवडणूक निकाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजप पक्ष २७ वर्षांनी दिल्लीत सत्तेत परतला. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत आपने २२ जागा जिंकल्या तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पुढील आठवड्यात भाजप सत्तेवर येण्याचा दावा करेल अशी अपेक्षा आहे, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांत दिल्लीत भाजपचा मतदानाचा टक्का जवळपास १३ टक्क्यांनी वाढला आहे तर याच काळात आपचा मतदानाचा टक्का जवळपास १० टक्क्यांनी घटला आहे. दिल्लीतील अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आपच्या मतांच्या टक्केवारीत फक्त दोन टक्क्यांचा फरक होता. ७० पैकी ४८ जागा जिंकून भगवा पक्षाने राष्ट्रीय राजधानीत सत्ता काबीज केली आहे ज्यामुळे ‘आप’ २२ जागांवर मर्यादित राहिला आहे.
‘आप’ने ४३.५७ टक्के मते मिळवली, जी २०२० च्या निवडणुकीत ५३.५७ टक्क्यांपेक्षा कमी होती. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ५४.५ टक्के मते मिळाली होती. ४० टक्के मते मिळवूनही एखाद्या पक्षाचा पराभव होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. २०२० आणि २०१५ मध्ये पक्षाने अनुक्रमे ६७ आणि ६२ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले.