Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर

Delhi High Alert: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटनंतर दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्यास सुरुवात केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2026 | 12:08 PM
१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर

Follow Us
Follow Us:
  • स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
  • १९ वाँटेड दहशतवाद्यांचा शोध, संवेदनशील भागांत सुरक्षा वाढवली
  • रेल्वे स्थानक, मेट्रो, बाजारपेठांसह गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त
Delhi High Alert: भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी… या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. याचपार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून संभाव्य दहशतवादी धोक्याबाबत इनपुट मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर १९ वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत आहेत. ही माहिती ११ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात देण्यात आली आहे.

Delhi High Court On Jantar Mantar: ‘जंतर मंतर येथील आंदोलनस्थळ बंदच का करत नाही?’ उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

१९ दहशतवाद्यांचे तीन मॉड्यूल

दिल्ली पोलिसांनी या १९ जणांना तीन गटांमध्ये विभागले आहे.

१. इंडियन मुजाहिदीन – ५ जण
इकबाल भटकल, रियाज भटकल, जुनैद अहमद, मोहम्मद खालिद आणि मोहसिन चौधरी यांचा या यादीत समावेश असल्याचे वृत्त आहे. इंडियन मुजाहिदीनचे नाव भारतातील अनेक बॉम्बस्फोटांच्या तपासात समोर आले आहे.

२. अल-कायदा – ६ जण
मोहम्मद शरजील अख्तर, मोहम्मद रेहान, अबू सूफियान, सैयद मोहम्मद आर्शियान, मोहम्मद शहीद फैजल उर्फ उस्ताद आणि मोहम्मद उमर या सहा जणांची नावे या मॉड्यूलमध्ये देण्यात आली आहेत.

३. खलिस्तानी संघटनांशी संबंधित – ८ जण
वाधवा सिंह बब्बर, पुरुषोत्तम सिंह पम्मा, हरविंदर सिंह रिंदा, गुरमीत सिंह बग्गा, भूपेंद्र सिंह भिंडा, रणजीत सिंह, परमजीत सिंह पम्मा आणि अर्शदीप सिंह डाला यांचा या गटात समावेश असल्याचे वृत्त आहे.

संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त

दिल्लीतील रेल्वे स्थानके, बसस्थानके, मेट्रो स्थानके, बाजारपेठा, ऐतिहासिक स्थळे आणि गर्दीच्या भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यासोबतच सीसीटीव्ही निगराणी, वाहन तपासणी आणि संशयित व्यक्तींची तपासणी यावर भर दिला जात आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास स्वतः कारवाई न करता तातडीने पोलिसांना किंवा संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही खबरदारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत आहे.

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

Web Title: Delhi high alert before august 15 19 wanted terrorists posters released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • delhi
  • Independence Day 2026
  • india

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
2

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
3

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
4

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.