Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel New Rules: १ ऑक्टोबरपासून पेट्रोल-डीझेल खरेदीसाठी PUCC अनिवार्य; पेट्रोल पंपांवर बसवले जाणार विशेष ANPR कॅमेरे

दिल्ली-एनसीआरमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून 'No PUCC, No Fuel' नियम लागू होणार आहे. गाझियाबाद, नोएडा आणि मेरठमधील १०४१ पेट्रोल पंपांवर ANPR कॅमेरे बसवून विना पीयूसीसी वाहनांना इंधन बंदी केली जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 03, 2026 | 07:59 PM
Fuel New Rules: १ ऑक्टोबरपासून पेट्रोल-डीझेल खरेदीसाठी PUCC अनिवार्य; पेट्रोल पंपांवर बसवले जाणार विशेष ANPR कॅमेरे
Follow Us
Follow Us:

 

  • वाहनधारकांसाठी मोठी बातमी!
  • १ ऑक्टोबरपासून पेट्रोल-डीझेल खरेदीसाठी PUCC अनिवार्य
  • पेट्रोल पंपांवर बसवले जाणार विशेष ANPR कॅमेरे
नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआर (NCR) क्षेत्रातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. आगामी १ ऑक्टोबर २०२६ पासून गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि मेरठ या भागांमध्ये PUCC (Pollution Under Control Certificate) म्हणजेच वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय गाड्यांना पेट्रोल, डीझेल किंवा सीएनजी (CNG) काहीही मिळणार नाही. या भागात आता थेट ‘नो पीयूसीसी, नो फ्युएल’ (No PUCC, No Fuel) हा कडक नियम लागू केला जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव एस. पी. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या एका उच्चस्तरीय समीक्षा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, वर्ष २०२६ मध्ये एनसीआर क्षेत्रातील वायू प्रदूषणाची पातळी तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी कमी करणे, हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.

२६ लाखांहून अधिक ‘कालबाह्य’ वाहनांची ओळख; ४६० गाड्या जप्त

मुख्य सचिव एस. पी. गोयल यांनी स्पष्ट केले की, प्रदूषमुक्तीचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, धुळीचे कण, बांधकामाचा कचरा (C&D Waste), हरित क्षेत्राचा विस्तार आणि पराली (पेंढा) व्यवस्थापन यांसारख्या प्रमुख घटकांवर युद्धपातळीवर काम केले जात आहे. बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीआर मधील जिल्ह्यांमध्ये जवळपास २६.१९ लाख ‘एंड-ऑफ-लाइफ’ (वापराची मुदत संपलेल्या) वाहनांची ओळख पटवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत ३७,१५६ वाहने ‘वापरासाठी अयोग्य’ म्हणून घोषित करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६० गाड्या प्रशासनाने जप्त केल्या आहेत.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! जुनी वाहने स्क्रॅप होणार; ५०४१ कोटींचा मेगा प्लॅन मंजूर

१,०४१ पेट्रोल पंपांवर बसणार अत्याधुनिक ANPR कॅमेरे

‘No PUCC, No Fuel’ ही यंत्रणा पूर्णपणे पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी एनसीआर मधील १,०४१ पेट्रोल पंपांवर विशेष ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन) कॅमेरे बसवण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. हे कॅमेरे पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनाची नंबर प्लेट स्वयंचलितपणे स्कॅन करतील आणि त्या वाहनाचे पीयूसीसी (PUCC) वैध आहे की नाही, याची माहिती थेट प्रणालीला मिळेल. पीयूसीसी (PUCC) हे वाहनातून निघणारा धुआं किंवा प्रदूषण सरकारी पर्यावरणीय मानकांच्या मर्यादेत असल्याचे प्रमाणित करणारे अधिकृत दस्तऐवज आहे. भारतात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने) वगळता सर्व प्रकारच्या इंधनचलित वाहनांसाठी हे प्रमाणपत्र सोबत बाळगणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.

पब्लिक ट्रान्सपोर्टचा कायापालट

वाहतूक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून ‘नया सफर’ ही विशेष योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून जुनी आणि अधिक प्रदूषण पसरवणारी वाहने टप्प्याटप्प्याने स्क्रॅप केली जात असून, बीएस-६ (BS-VI) मानकांची वाहने, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transport) पूर्णपणे पर्यावरणपूरक बनवण्यासाठी गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि मेरठ या शहरांमध्ये एकूण ९७५ इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या शहरांमध्ये १०० ई-बसेस यशस्वीरित्या धावत असून लवकरच उर्वरित बसेस ताफ्यात सामील केल्या जातील.

निवडणूक आयोगाचा तिसरा टप्पा सुरू! ‘SIR’ साठी ‘या’ राज्यांमध्ये राबवले जाणार घर-घर अभियान

Web Title: Delhi ncr fuel new rules october 1 pucc mandatory anpr cameras petrol pumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Delhi- NCR
  • Fuel Supply
  • new rules
  • petrol

संबंधित बातम्या

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…
1

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत
2

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल
3

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

Credit Card : अरे वाह! बँकेत खातं नसलं तरीही मिळणार क्रेडिट कार्ड, कसा अर्ज करावा? नेमके काय आहेत नियम?
4

Credit Card : अरे वाह! बँकेत खातं नसलं तरीही मिळणार क्रेडिट कार्ड, कसा अर्ज करावा? नेमके काय आहेत नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.