Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast Live: कारमध्ये 6:52 वाजता स्फोट, पोलीस व एनआयएचा तपास सुरू

दिल्लीतील लाल किल्लाच्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ असलेल्या पार्किंगच्या सिग्नलला उभ्या असलेल्या कारचा अचानक भडका उडाला. सिलेंडरचा स्फोट झाल्याचे आधी काहींना वाटलं पण नंतर त्या स्फोटाची गंभीरता लक्षात आली.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 10, 2025 | 10:21 PM
Delhi Blast Live: कारमध्ये 6:52 वाजता स्फोट, पोलीस व एनआयएचा तपास सुरू
Follow Us
Close
Follow Us:

Delhi Blast Live: दिल्लीमध्ये सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी एक चारचाकी गाडी हळू हळू रेड सिग्नला येऊन थांबली. आणि अचानक आगीचा भडका उडाला. त्याचसोबत मोठा स्फोटाचा आवाज झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हा स्फोट झाला असून यामुळे दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर देशातील मुंबईसह महत्वाच्या ठिकाणी शहरांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.

त्याचदरम्यान, आता दिल्ली पोलीस कमिशनर सतीश गोलचा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तपास यंत्रणेने तात्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तसेच, या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, FSL , NIA , NSG याठिकाणी दाखल झाले होते. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांनाही प्रचंड आग लागली होती.

या दुर्घटनेत बरेच जण जखमी झाले असून यात घटनेत अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेत यासंबधित सगळी माहिती मागून घेतली आहे. ज्या कारचा स्फोट झाला होता ती कार हरियाणाची असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटात वापरली गेलेली कार ही खान नावाच्या माणसाची असून याबद्दल पुढील तपास सुरू आहे.

Delhi Car Blast: बॉम्बस्फोटासाठी केला गाडीचा वापर ; लाल किल्ल्याजवळच्या स्फोटामागे दहशतवाद्यांचा कट ?

स्फोटाने हादरली दिल्ली!

दिल्लीतील लाल किल्लाच्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ असलेल्या पार्किंगच्या सिग्नलला उभ्या असलेल्या कारचा अचानक भडका उडाला. सिलेंडरचा स्फोट झाल्याचे आधी काहींना वाटलं पण नंतर त्या स्फोटाची गंभीरता लक्षात आली. पोलीस प्रशासन घटनास्थळी दखल झाल्यावर त्यांनी संपूर्ण परिसर रिकामी केला. स्फोटाच्या अग्नितांडवामुळे अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तसेच एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले असून त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. या स्फोटाचे पुरावे गोळा करायचे काम सुरु आहे.

दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट

हा ब्लास्ट झाल्यानंतर त्या परिसरातील दुकानांना त्वरित अलर्ट जारी करण्यात आला. चांदणी चौकातील भगीरथ पॅलेस परिसरातही ब्लास्टचे धक्के जाणवले आणि दुकानदार एकमेकांना फोन करून परिस्थितीची विचारपूस करताना दिसले. अनेक बसेस आणि इतर वाहनांना आग लागल्याचे वृत्त आहे. दिल्लीत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत अनेक वेळा दिल्ली ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा घटनाक्रम जाणून घेऊया. 

 

Web Title: Delhi police and nia investigation delhi red fort metro station blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 10:19 PM

Topics:  

  • Blast
  • Delhi news
  • NIA
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया, शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना
1

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया, शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

Amit Shah: Delhi Bomb Blast मधील गाडी ही हरयाणाची; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली स्पष्ट माहिती
2

Amit Shah: Delhi Bomb Blast मधील गाडी ही हरयाणाची; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली स्पष्ट माहिती

Delhi Blast नंतर RSS मुख्यालयाला पोलिसांचा वेढा; अतिरिक्त सुरक्षा दलासह…; महाराष्ट्रात काय स्थिती?
3

Delhi Blast नंतर RSS मुख्यालयाला पोलिसांचा वेढा; अतिरिक्त सुरक्षा दलासह…; महाराष्ट्रात काय स्थिती?

Delhi Blast News: PM मोदींनी अमित शहा यांच्याशी साधला संवाद; गृहमंत्री म्हणाले – ‘राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ खपवून घेणार नाही’
4

Delhi Blast News: PM मोदींनी अमित शहा यांच्याशी साधला संवाद; गृहमंत्री म्हणाले – ‘राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ खपवून घेणार नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.