Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे वेगाने विकसित होणाऱ्या भारताची जीवनरेखा आहेत. हे आधुनिक मालवाहतूक जाळे भारतातील बदलांचा वेग वाढवत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2026 | 07:51 AM
काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने

Follow Us
Follow Us:

वडोदरा : भारताने 2014 नंतर 50000 आधुनिक रेल्वे डबे बांधले. मागील काँग्रेस सरकारला 10 वर्षांत 50000 शौचालयेसुद्धा बांधता आली नाहीत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत देशातील मागील काँग्रेस-प्रणित सरकारवर विकासकामांच्या संथ गतीवरून निशाणा साधला. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा ट्रक चालकांवर होणाऱ्या परिणामाबद्दल आता संतप्त काका प्रश्न उपस्थित करतील, असेही ते म्हणाले.

गुजरातच्या वडोदरा येथे 35000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका जाहीरसभेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदींनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (पश्चिम) च्या तीन प्रमुख विभागांचे उद्घाटन केले. हा कॉरिडॉर नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराला उत्तर प्रदेशातील दादरीशी जोडतो. या विभागांच्या उद्घाटनाने हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे वेगाने विकसित होणाऱ्या भारताची जीवनरेखा आहेत. हे आधुनिक मालवाहतूक जाळे भारतातील बदलांचा वेग वाढवत आहे. पूर्वी प्रवासी आणि मालगाड्यांना एकाच रुळावरून धावावे लागत असे, ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही मंदावत असे, परंतु डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरने ही परिस्थिती बदलली आहे.

PM Narendra Modi : उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ उपक्रमावर टीका केली. तरुण पिढी सत्याच्या बाजूने उभी राहील आणि खोटेपणाच्या प्रतिध्वनीने दिशाभूल होणार नाही, तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचे आवाहनही केले. तुम्हाला सर्वत्र असे लोक आढळतील जे ‘खोटेपणाच्या प्रतिध्वनीने’ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण आजची तरुण पिढी सत्याच्या बाजूने उभी राहील.

महामार्ग प्रकल्पांनाही चालना

सुमारे १,७८० कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. NH-48 वरील कामरेज-चलथान विभागाचे सहापदरीकरण, वडोदरा-सूरत मार्गावर तापी आणि नर्मदा नद्यांवरील प्रमुख पुलांसह अतिरिक्त पायाभूत सुविधा आणि NH-53 वरील अभवा, मिंधोला व खजोद जंक्शनवरील ग्रेड-सेपरेटेड स्ट्रक्चर्सचा यात समावेश आहे. कंदारी चौकडी आणि लुवारा पाटिया येथील सहापदरी उड्डाणपुलांचे उद्घाटनही होणार आहे.

Web Title: Development was slow during congress era pm narendra modi attack on congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • Congress Politics
  • narendra modi
  • national news

संबंधित बातम्या

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग
1

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
2

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
3

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.