Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू

१९ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणुकीचा निकाल आज, 'SIR' मधील मतदारांसाठी मतदार नोंदणी सुधारणा प्रस्ताव, टायगर श्रॉफ गाडी गोळीबार प्रकरण, आशियाई पॅरा गेम्सचा प्रारंभ आणि राज्यातील ऑक्टोबर हीटचा तडाखा; वाचा सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 19, 2026 | 10:25 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 19.10.2026

Maharashtra Breaking News Today 19.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 19 Oct 2026 10:25 AM (IST)

    19 Oct 2026 10:25 AM (IST)

    गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

    भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आज शेअर बाजार सावधपणे सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९ ऑक्टोबर रोजी गिफ्ट निफ्टीने संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सोमवारी आशियाई बाजारांमध्ये घसरण झाली, तर स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी अमेरिकन स्टॉक फ्युचर्समध्ये संमिश्र कल दिसून आला. भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी कायम ठेवत सकारात्मक पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ४०० हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टी ५० ने २३,१०० चा टप्पा पुन्हा गाठला.

  • 19 Oct 2026 10:15 AM (IST)

    19 Oct 2026 10:15 AM (IST)

    मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! रिसोर्स रिकव्हरी केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये

    मुंबई शहरातील पारंपारिक सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे अत्याधुनिक ‘संसाधन पुनर्प्राप्ती केंद्रां मध्ये रूपांतर करण्यात येणार असून, यासाठी २३ कोटी ३८ लाख रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणीसाठी ‘राईट्स लिमिटेड’ची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेला ९२.५७ लाख रुपये शुल्क देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

  • 19 Oct 2026 10:05 AM (IST)

    19 Oct 2026 10:05 AM (IST)

    Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

    मिरा-भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून तुफान हाणामारी आणि गोंधळ उडाला असतानाच सत्ताधारी भाजपने शेकडो कोटी रुपयांच्या खर्चाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपये, तर मलनिःसारण केंद्रांच्या देखभाल-दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १८८ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावांचा यात समावेश आहे. मात्र, एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदींशी संबंधित प्रस्तावांवर सविस्तर चर्चा न करता बहुमताच्या जोरावर निर्णय घेतल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कामांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणे आवश्यक असताना महासभेचे कामकाज घाईघाईने उरकण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला.

  • 19 Oct 2026 09:55 AM (IST)

    19 Oct 2026 09:55 AM (IST)

    Yashpal Benam Resigns BJP:  उत्तराखंडमधील माजी आमदार यशपाल बेनाम यांनी सोडली पक्षाची साथ 

    Yashpal Benam Resigns BJP:   उत्तराखंड राज्याच्या राजकीय वर्तुळातून भाजपसाठी एक मोठी आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. गेल्या ८ वर्षांपासून पक्षाच्या शिस्तीत राहून पक्षाचे आदेश प्रामाणिकपणे पाळणारे माजी आमदार यशपाल बेनाम यांनी भाजपला अखेर रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या या निर्णयामुळे उत्तराखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल ८ वर्षे भाजपमध्ये सक्रिय राहून विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे यशपाल बेनाम यांनी अचानक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • 19 Oct 2026 09:45 AM (IST)

    19 Oct 2026 09:45 AM (IST)

    Shubman Gill Ranji Trophy: टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल रणजी ट्रॉफीत अपयशी!  

    भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याच्यासाठी आगामी न्यूझीलंड दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्याची तयारी मजबूत करण्यासाठी आणि फॉर्म मिळवण्यासाठी गिलने रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या हंगामात खेळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मात्र, पंजाब आणि छत्तीसगड यांच्यात न्यू चंदीगड येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या एलिट गट 'ब' मधील सामन्यात त्याच्या या पुनरागमनाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली.

    नाणेफेक जिंकून पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून आणि न्यूझीलंड मालिकेच्या दृष्टीने सर्वांच्या नजरा शुभमन गिलच्या फलंदाजीवर खिळल्या होत्या. क्रीजवर स्थिरावण्याची संधी मिळण्यापूर्वीच गिल स्वस्तात बाद झाला. त्याने अवघ्या ५ चेंडूंचा सामना करत फक्त १ धाव काढली आणि त्याला माघारी परतावे लागले.

  • 19 Oct 2026 09:35 AM (IST)

    19 Oct 2026 09:35 AM (IST)

    Pune Yerawada Pothole Drainage Death : येरवडा येथे महापालिकेच्या १०-१५ फूट खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी यांचा मृत्यू 

    पुणे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरातील मच्छी मार्केट भागात महापालिकेच्या ड्रेनेज कामासाठी खोदलेल्या १० ते १५ फूट खोल खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १७ ऑक्टोबर रोजी ही दुर्घटना घडली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. रिक्षाचा धक्का लागल्यामुळे प्रदीप परदेशी यांचा तोल गेला आणि ते थेट १० ते १५ फूट खोल खड्ड्यात पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे.

  • 19 Oct 2026 09:19 AM (IST)

    19 Oct 2026 09:19 AM (IST)

    Tiger Shroff Car Firing:  टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायर;  अनिल पंडीत-हरमन संधूने घेतली जबाबदारी

    Tiger Shroff Car Firing:  मुंबईच्या जुहू परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार गोळीबार केला आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप बचावला असला, तरी त्याचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत.

    जुहू पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हा गोळीबार झाला. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर तब्बल दहा गोळ्या झाडल्या.या प्राणघातक हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप राहिला.  मात्र त्याचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वतः टायगरने गाडी चालवत मदत केली.

Maharashtra to World Breaking News :  

मुंबईतील जुहू परिसरात बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरू असून बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. कोल्हापुरातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) फॉर्म ६ मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ECI) प्रस्ताव पाठवला असून ‘SIR’ अंतर्गत वगळलेल्या मतदारांना पुन्हा नोंदणी सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे १८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये १६८ भारतीय पॅरा-ॲथलीट्सचे पथक पदकांची कमाई करण्यासाठी मैदानात उतरले आहे.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 19 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
1

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!
2

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
3

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Kolkata Devi Pandal Tragedy News: दुर्गापूजेच्या मंडपात मृत्यूचे तांडव! १९ भाविकांचा मृत्यू, ७ जणांना अटक
4

Kolkata Devi Pandal Tragedy News: दुर्गापूजेच्या मंडपात मृत्यूचे तांडव! १९ भाविकांचा मृत्यू, ७ जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.