Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक

India China Tension At Arunachal Pradesh Border: भारतात झालेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत शी जिनपिंग यांचा सहभाग आणि जुलैपासून दोन्ही देशांमध्ये झालेल्या तीन उच्चस्तरीय बैठका (डब्ल्यूएमसीसी, विशेष प्रतिनिधी संवाद, कॉर्प्स कमांडर स्तरावरील) होऊनही तणाव कायम आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 23, 2026 | 11:56 AM
India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक
Follow Us
Follow Us:
  • अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत आणि चीनचे सैनिकांमध्ये संघर्ष
  • आसाफिला आणि माजा भागात जुलै महिन्यापासून तणाव कायम
  • ITBP प्रमुख शत्रुजीत कपूर यांचा गौप्यस्फोट
 India China Tension at Arunachal Border : भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेश सीमेवर अनेक वेळा आमनेसामने आले आहेत आणि ते अजूनही सुरू आहेत, अशी माहिती आयटीबीपीचे डीजी शत्रुजीत कपूर यांनी याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. यापूर्वी डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता. काँग्रेसने या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

आयटीबीपीचे डीजी शत्रुजीत कपूर एका कार्यक्रमात यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. जयराम रमेश यांनी त्यांच्या शत्रुजीत कपूर यांचे मुद्दे पोस्टमध्ये शेअर केले आहेत. “अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वेळा भारत-चीन सैन्य आमनेसामने आले आहेत, हा संघर्ष अजूनही सुरू आहे. आमचे शौर्य कमांडो पथक तिथे आहेत आणि त्यांनी उत्तम काम केले आहे. हा एक नवीन उपक्रम होता. आपल्याला माहीत आहे की, आयटीबीपीची सुरुवात एक पर्वतीय गनिमी दल म्हणून झाली होती. त्यानंतर, आम्ही एक पारंपरिक दल म्हणून चीनची सीमा हाताळली.” आता गनिमी युद्धाची गरज नाही, तर आम्हाला स्वतःला एक उंच प्रदेशातील दल म्हणून स्थापित करण्याची गरज आहे.

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

नेमकं काय म्हटलं आहे शत्रुजीत कपूर यांनी आपल्या भाषणात

शत्रुजीत यांनी गुरुवारी राजस्थानमधील अलवर येथील सेंट्रल ट्रेनिंग कॉलेजमध्ये हिमवीर सन्मान सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आयटीबीपीचे डीजी शत्रुजीत कपूर म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत अरुणाचल प्रदेशात अनेक ठिकाणी चिनी आणि भारतीय सैन्य आमनेसामने आले असून, संघर्षही झाला आहे. ही परिस्थिती अजूनही कायम आहे.

जुलै महिन्याच्या अखेरीपासून अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील आसाफिला आणि माजा भागात तणाव कायम आहे. भारताने सीमेवर आपली तैनातीही वाढवली आहे. तीन बैठका होऊनही तणाव कायम आहे.” भारतात झालेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत शी जिनपिंग यांचा सहभाग आणि जुलैपासून दोन्ही देशांमध्ये झालेल्या तीन उच्चस्तरीय बैठका (डब्ल्यूएमसीसी, विशेष प्रतिनिधी संवाद, कॉर्प्स कमांडर स्तरावरील) होऊनही तणाव कायम आहे.

ड्रोनमुळे पारंपरिक युद्ध लढण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे. आयटीबीपी ड्रोन विकसित करण्यावर आणि ड्रोनविरोधी क्षमता मजबूत करण्यावर काम करत आहे. आयटीबीपी एलएसीजवळ आपल्या संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी भूमिगत आश्रयस्थान बांधत आहे.’ याकडेही शत्रुजीत यांनी लक्ष वेधलं आहे.

Ghantali Devi Temple: १५० वर्ष जुन्या असलेल्या मंदिरांचा काय आहे इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

काँग्रेसचा सरकारवर मौनाचा आरोप

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी या संघर्षांवर सरकार गप्प राहिल्याचा आरोप केला आहे. रमेश यांनी X वर लिहिले, “१९ जून २०२० रोजी पंतप्रधानांनी चीनला दिलेल्या कुप्रसिद्ध क्लीन चिटची किंमत भारत मोजत आहे. एकीकडे स्वयंघोषित विश्वगुरूचीनला विचारपूर्वक सवलती देत ​​आहेत, तर दुसरीकडे आयटीबीपीच्या डीजींनी अरुणाचल प्रदेशात पीएलए सोबत झालेल्या अलीकडील संघर्षातील दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.”

जयराम रमेश यांनी ट्विटरवर लिहिले, “जे स्वतःला जागतिक नेते म्हणतात, त्यांनी चीनला मोकळीक दिली आहे. अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्यासोबत झालेल्या अलीकडील संघर्षात आपल्या सैनिकांच्या कामगिरीबद्दल आयटीबीपीच्या डीजींनी योग्यच प्रशंसा केली आहे. मात्र, पंतप्रधानांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. हे आश्चर्यकारक आहे.”

डोकलाममध्येही भारत-चीन संघर्ष

दरम्यान, २०१७ मध्ये भारत आणि चीनमध्ये दीर्घकाळ तणाव होता. डोकलाममध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता. यानंतर काही काळ शांतता नांदली असली तरी, पुन्हा तणाव वाढला आहे. संसदेतही डोकलामचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उपस्थित करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

While the self-styled Vishwaguru’s calibrated concessions to China continue, the DG, ITBP, has lauded—and rightly so—its performance in recent face-offs with the PLA in Arunachal Pradesh, on which there has been a deafening silence from the PM and his establishment. Corps commander talks were held at Wacha and Damai in Arunachal Pradesh last month after the Taksing face-off. Locals had reported that patrolling points had been lost once again, as in Ladakh. China continues to rename our towns in Arunachal Pradesh and is building a 60,000-MW dam that threatens our ecological and water security. India’s trade deficit with China zoomed even further to a record $112 billion in 2025–26, up from $99 billion the previous year. This has simply crushed our MSMEs in many industries. Make in India has become Import from China. This staggering trade deficit is in itself a very significant threat to our economic security. India has been paying the price for the PM’s infamous clean chit to China on June 19, 2020, when he said, after 20 of our brave jawans had been martyred: “ना कोई वहाँ हमारी सीमा में घुस आया है और न ही कोई घुसा हुआ है, न ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के कब्ज़े में है।” The retired Chief of Army Staff, Gen. Naravane, has revealed that the only instructions he received while at the helm, when Chinese incursions took place in Ladakh, were: “जो उचित समझो वो करो।” On July 4, 2025, the Deputy Chief of Army Staff, Lt. Gen. Rahul Singh, had spoken publicly on China’s both intensively and extensively embedded role in Pakistan’s military campaign during our Operation Sindoor. Yet, on August 25, 2026, the retired Chief of Defence Staff, Gen. Anil Chauhan, publicly contradicted Lt. Gen. Rahul Singh’s revelations and, soon thereafter, took over a think tank that is a key part of the RSS/BJP ecosystem. — Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 23, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: अरुणाचल प्रदेश सीमेबाबत ITBP डीजी शत्रुजीत कपूर यांनी काय खुलासा केला?

    Ans: अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी (विशेषतः अप्पर सुबनसिरी भागात) भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले असून, लष्करी तणाव अजूनही कायम आहे.

  • Que: या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर काय आरोप केले आहेत?

    Ans: काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की, ब्रिक्स परिषद आणि तीन उच्चस्तरीय लष्करी/राजनैतिक बैठका पार पडल्यानंतरही अरुणाचल सीमेवर तणाव कायम असणे हे सरकारचे अपयश आहे.

  • Que: अरुणाचल प्रदेशातील कोणत्या भागांमध्ये तणाव सर्वाधिक आहे?

    Ans: अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील 'आसाफिला' आणि 'माजा' भागात जुलै महिन्यापासून तणाव वाढला असून भारताने तेथे अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.

Web Title: National india china arunachal border tension itbp dg shatrujeet kapur revelation as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • India china Border Clash
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: चीनच्या तिबेटमध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: चीनच्या तिबेटमध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ
2

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ

Maharashtra Live Breaking News in Marathi:  सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.