ध्रुव राठीविरोधात न्यायालयाचा मोठा आदेश
Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. CJP आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीच्या अडचणी आता वाढण्याच्या शक्यता असून 2018 सालच्या एका मानहानी प्रकरणात ध्रुव राठीला कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे. दिल्लीतील साकेत न्यायालयाने 2018 पासून प्रलंबित असलेल्या एका मानहानी प्रकरणात राठीविरोधात नव्याने समन्स जारी केले आहे.
तक्रारदार विकास पांडे यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला असल्याचे समजत आहे. ध्रुव राठीच्या ‘बीजेपी आयटी सेल पार्ट 2’ या युट्युब व्हिडीओमुळे आपली मानहानी झाल्याचा दावा विकास पांडे यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेल्या आणि आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला या प्रकरणात भारतात अडकवण्याचा हा डाव तर नाही ना? अश्या प्रकारच्या चर्चा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत.
तक्रारदार विकास पांडे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्हिडीओमध्ये त्यांना भाजपच्या आयटी सेलशी जोडण्यात आले होते. तसेच, कोणालातरी ५० लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आल्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
या आरोपांवरून त्यांनी ध्रुव राठीविरोधात गुन्हेगारी मानहानीची तक्रार दाखल केली होती. हे आरोप तक्रारदाराने केलेले असून, त्यावरून न्यायालयाने अंतिम निष्कर्ष दिला आहे, असे समजणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वकिलांनी ध्रुव राठीला समन्स बजावण्यात येणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केल्याचे वृत्त आहे. ध्रुव राठी बहुतांश काळ ऑस्ट्रियामध्ये राहत असल्याने समन्स बजावण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.
यानंतर न्यायालयाने गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील पत्त्यावर नव्याने समन्स जारी करण्याचे निर्देश दिले. तसेच, समन्स बजावण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
तक्रारदाराच्या वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने ‘दस्ती समन्स’ बजावण्यासही परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत संबंधित कायदेशीर नियमांनुसार तक्रारदार किंवा त्याचा प्रतिनिधी समन्स पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडू शकतो.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ध्रुव राठीने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. ११ ऑक्टोबर रोजी त्याने सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार, साध्या कपड्यांतील पोलिसांनी त्याला गुरुग्राममधील घरातून नेले आणि वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिरवले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपण भारतात आल्याचेही ध्रुव राठीने म्हटले होते. आपल्या नागरिकत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना त्याने आपण भारतीय नागरिक असून आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असल्याचे स्पष्ट केले होते.
एकीकडे जुन्या मानहानी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे, तर दुसरीकडे आंदोलनातील सहभागावरूनही ध्रुव राठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.
Ans: ‘बीजेपी आयटी सेल पार्ट 2’ या यूट्यूब व्हिडीओमुळे मानहानी झाल्याचा दावा विकास पांडे यांनी केला आहे. त्यावरून हे प्रकरण सुरू झाले.
Ans: न्यायालयाने ध्रुव राठीविरोधात नव्याने समन्स जारी करून गुरुग्राममधील पत्त्यावर समन्स बजावण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिले. दस्ती समन्सलाही परवानगी दिल्याचे वृत्त आहे.
Ans: नाही. समन्स म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेत संबंधित व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी किंवा कार्यवाहीची माहिती देण्यासाठी जारी केलेली नोटीस. त्यावरून दोष सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही.






