Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Earthquake in J&K: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं जम्मू -काश्मीर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अचानक भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव केला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 12, 2025 | 04:06 PM
Earthquake in JK: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं जम्मू -काश्मीर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in JK: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं जम्मू -काश्मीर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: जम्मू- काश्मीरमध्ये दुपारच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १ वाजल्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, भूकंपाचे धक्के जाणवले असले तरी कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.

भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये होते. जमिनीपासून १० किलोमीटर खाली भूकंपाचे मुख्य केंद्र होते. भूकंपाचे केंद्र रावळपिंडी पासून ६० कीमी दूर होते. अचानक भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव केला.

म्यानमारनंतर आता ‘या’ देशातही जाणवले भूकंपाचे धक्के

ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे सौम्य, पण जाणवण्यासारखे धक्के नोंदवण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या 110 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाची नोंद 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजून 24 मिनिटे आणि 9 सेकंदांनी झाली. ताजिकिस्तानच्या राजधानीजवळ आणि इतर भागांमध्ये नागरिकांना अचानक जमिनीखालून धक्के जाणवले, त्यामुळे अनेक जण भीतीपोटी घराबाहेर पडले. परंतु, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

सावधतेचा इशारा, म्यानमारमधील आपत्तीचा ताजा अनुभव

अलिकडेच म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण आशियाला हादरवून टाकले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ३,००० नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी व बेपत्ता झाले आहेत. भारतासह अनेक देशांनी तातडीने मदत आणि बचावकार्यासाठी म्यानमारमध्ये मदत पाठवली.

Earthquake in Tajikistan: म्यानमारनंतर आता ‘या’ देशातही जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के

भूकंप का होतात?  वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घ्या

पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या प्रचंड खडकांच्या पट्ट्या असतात. पृथ्वीवर एकूण १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत हालचालीत असतात – काही वेळा एकमेकींवर आदळतात, तर कधी एकमेकांपासून दूर जातात. या हालचालींमुळे जेव्हा संचित ऊर्जेचा विस्फोट होतो, तेव्हा भूकंप निर्माण होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जाते. ४.२ ही तीव्रता सौम्य श्रेणीत मोडते, आणि सामान्यतः अशा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत नाही. परंतु, जर भूकंप अधिक तीव्रतेचा असेल, तर भूस्खलन, इमारतींचे पडणे, जलमार्ग आणि वाहतुकीचे नुकसान होऊ शकते.

Web Title: Earthquake in jammu kashmir main center at pakistan rawalpindi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Earthquake
  • jammu kashmir
  • pakistan

संबंधित बातम्या

Japan Earthquake: निसर्गापुढे जपान हतबल! जपानमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप; उत्तर जपान समुद्रात 50 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू
1

Japan Earthquake: निसर्गापुढे जपान हतबल! जपानमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप; उत्तर जपान समुद्रात 50 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.