
Earthquake : एकाच दिवशी तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के; तिबेट, सोलोमन द्वीप हादरले, महाराष्ट्रातील 'या' ठिकाणाचा समावेश
देशासह जगातील तीन वेगवेगळ्या भागांत रविवारी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. महाराष्ट्रातील यवतमाळ, तिबेट आणि सोलोमन द्वीप येथे एकाच दिवशी तीन स्वतंत्र भूकंपांची नोंद झाली. यामध्ये सोलोमन द्वीप येथे सर्वाधिक 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने, या तिन्ही ठिकाणांहून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या आर्थिक नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही.
महाराष्ट्रातील यवतमाळ येथे रविवारी दुपारी 3 वाजून 3 मिनिटे 4 सेकंदांनी भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर अक्षांश 20.470 अंश आणि पूर्व रेखांश 78.350 अंश येथे होता. जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद करण्यात आली.
भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठ्या नुकसानीची शक्यता कमी होती. त्यामुळे यवतमाळमधून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त आलेले नाही.
तिबेटमध्ये रविवारी दुपारी 2 वाजून 41 मिनिटे 22 सेकंदांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू उत्तर अक्षांश 33.713 अंश आणि पूर्व रेखांश 86.192 अंश येथे होता. जमिनीपासून सुमारे 180 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला.
भूकंपाची खोली अधिक असल्याने त्याच्या धक्क्यांचा जमिनीवरील परिणाम तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे तिबेटमध्येही मोठ्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही.
Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण
या तिन्ही भूकंपांमध्ये सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप सोलोमन द्वीप येथे झाला. रविवारी सकाळी 9 वाजून 5 मिनिटे 2 सेकंदांनी येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण अक्षांश 10.853 अंश आणि पूर्व रेखांश 165.659 अंश येथे होता. जमिनीपासून सुमारे 42 किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद झाली.
6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप तुलनेने जोरदार मानला जातो. अशा भूकंपामुळे इमारती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, या घटनेत अद्याप जीवितहानी किंवा नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.