नवी दिल्ली- मंगळवारी रात्री उशिरा अफगानीस्तानसह देशातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तानसह भारतातील काही भागांत मंगळवारी रात्री भूकंपाचे (Earthquakes) धक्के जाणवले. रात्री १०.२० च्या सुमारास आलेल्या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदुकुश क्षेत्रातील फैजाबादमध्ये होते. त्याची तीव्रता 6.6 रिश्टर एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात जाणवले. (delhi, uttar pradesh, punjab, rajasthan) याठिकाणी भीतीने लोकं रात्रभर रस्त्यावर आले होते. या भूकंपाची खोली 156 किमी असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच याचे केंद्र हिंदूकूश (Hindu Kush) पर्वतरांगेमध्ये आहे.
Earthquake tremors felt in Delhi. Details awaited. pic.twitter.com/Hs0A6BUEiU
— ANI (@ANI) March 21, 2023
पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के…
मागील काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. टर्की, चीन, नेपाळ, ताजिकिस्ताननंतर आता अफागाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून या घटनेत पाकिस्तानातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्येह काही दिवसांपूर्वीच भूकंपाचा धक्का बसला होता.
#WATCH | Uttar Pradesh: People rush out of their houses in Vasundhara, Ghaziabad as strong earthquake tremors felt in several parts of north India. pic.twitter.com/wg4MWB0QdX
— ANI (@ANI) March 21, 2023
भीतीनं रात्रभर लोकं रस्त्यावर
दरम्यान, या भूकंपाची खोली 156 किमी असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच याचे केंद्र हिंदूकूश (Hindu Kush) पर्वतरांगेमध्ये आहे. त्यामुळेच याचा धक्का अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान या देशांना बसल्याची माहिती आहे. या भूकंपाची 71.09 अशांशावर नोंद करण्यात आला आहे. लडाखमध्ये रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. लडाखमध्ये बसलेले हे भूकंपाचे धक्के हे 23 सेकंद इतक्या वेळेसाठी होते. नवी दिल्लीत भूकंपाचा धसका लोकांनी खूप घेतला, त्यामुळं लोकं रात्रभर दिल्लीच्या रस्त्यावर बसून होते.