Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

यंदाचा ‘एल निनो’ इतिहासातील सर्वाधिक तीव्र ठरू शकतो, असा अंदाज युरोपीय हवामान मॉडेलने व्यक्त केला होता. मात्र, सीपीसीच्या ताज्या अंदाजात त्याच्या तीव्रतेबाबत काहीशी साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 17, 2026 | 03:56 PM
India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
Follow Us
Follow Us:

प्रशांत महासागराच्या तापमानात सातत्याने वाढ
जून महिन्यातच ‘एल निनो’ची स्थिती येण्याची शक्यता
मान्सून हंगामावर त्याचा परिणाम होण्याचा अंदाज

सुनयना सोनवणे/पुणे: विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, यंदा जून महिन्यातच ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (सीपीसी) ने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, सध्या महासागरात असलेली न्यूट्रल (India Rain) स्थिती लवकरच ‘एल निनो’मध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या मान्सून हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सीपीसीच्या अहवालानुसार, सलग पाचव्या महिन्यात प्रशांत महासागराच्या समुद्रपृष्ठ तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. जूनमध्ये ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता तब्बल ८२ टक्के असून, ही स्थिती पुढे कायम राहण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ‘एल निनो’ कायम राहण्याची शक्यता ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उकाड्यापासून आता दिलासा मिळणार; राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मान्सूनचे आगमन होत असतानाच ‘एल निनो’ सक्रिय होणे ही बाब भारतासह आशियाई देशांसाठी चिंतेची मानली जात आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे प्रशांत महासागरावर कमी दाबाची स्थिती तयार होते. परिणामी भारतीय उपखंडावरील मोसमी वाऱ्यांचा वेग कमी होऊन पर्जन्यमान घटण्याची शक्यता वाढते. तसेच वातावरणातील बाष्प पूर्वेकडे खेचले गेल्याने मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.

यंदाचा ‘एल निनो’ इतिहासातील सर्वाधिक तीव्र ठरू शकतो, असा अंदाज युरोपीय हवामान मॉडेलने व्यक्त केला होता. मात्र, सीपीसीच्या ताज्या अंदाजात त्याच्या तीव्रतेबाबत काहीशी साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान महासागराचे तापमान सरासरीपेक्षा १.५ ते २ अंश सेल्सिअस अधिक राहू शकते. जून-जुलैमध्ये क्षीण, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मध्यम, तर ऑक्टोबरनंतर तीव्र किंवा अतितीव्र ‘एल निनो’ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’चा परिणाम केवळ पावसापुरता मर्यादित राहत नाही. २०२७ मध्ये उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची, जागतिक तापमान विक्रमी पातळीवर जाण्याची तसेच समुद्री जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच आर्थिक तणावाचा सामना करणाऱ्या आशियाई देशांसमोर ‘एल निनो’मुळे आणखी आव्हाने निर्माण होऊ शकतात.

Web Title: El nino expected to impact the monsoon season in june imd india mahrashtra rain weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Monsoon 2026
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
1

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर; आसाममधील पुरात आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू
2

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर; आसाममधील पुरात आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू

पुण्यात पावसाची ‘विश्रांती’, पण उकाड्याने पुणेकर त्रस्त! शनिवारी हलक्या सरींचा शिडकावा होणार?
3

पुण्यात पावसाची ‘विश्रांती’, पण उकाड्याने पुणेकर त्रस्त! शनिवारी हलक्या सरींचा शिडकावा होणार?

देशातील अनेक भागांत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; केरळ, कर्नाटकात पुढील 3 दिवस…
4

देशातील अनेक भागांत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; केरळ, कर्नाटकात पुढील 3 दिवस…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.