Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Weather: ऑक्टोबरमध्ये पावसाने पुणेकरांना दाखवला ठेंगा! ११ वर्षांत यंदा केवळ ‘इतका’ पाऊस

Pune Weather: गेल्या अकरा वर्षांतील आकडेवारी पाहता ऑक्टोबरमधील पावसाचे प्रमाण वर्षागणिक बदलत असल्याचे दिसते. २०२० मध्ये सर्वाधिक ३१३.३ मिलिमीटर, तर २०२२ मध्ये ३०३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 07:12 PM
पुण्यात ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाची पाठ 

पुण्यात ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाची पाठ 

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाची पाठ 
  • केवळ दोन दिवस पावसाची हजेरी, तापमानात वाढ
  • महिनाभरात अवघा १.७ मिलिमीटर पाऊस
सुनयना सोनवणे / Pune Weather:  यंदा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने पुणे शहराकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महिनाभरात शिवाजीनगर वेधशाळेच्या हद्दीत अवघ्या १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या अकरा वर्षांतील ऑक्टोबर महिन्याच्या पावसाच्या आकडेवारीचा विचार करता यंदाचा पाऊस नीचांकी ठरला आहे. महिन्यात केवळ दोन दिवस पावसाने हजेरी लावली. उर्वरित काळात कोरडे हवामान राहिल्याने शहरात तापमानवाढ जाणवली.

सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पुण्यात परतीच्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतात. मात्र, यंदा पावसाने जवळपास संपूर्ण महिना दडी मारली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ऑक्टोबर रोजी १.४ मिलिमीटर, तर ३० ऑक्टोबर रोजी ०.३ मिलिमीटर पाऊस झाला. या दोन दिवसांचा अपवाद वगळता महिनाभरात पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी, शहर आणि परिसरात बहुतांश काळ कोरडे वातावरण राहिले.

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

गेल्या अकरा वर्षांतील आकडेवारी पाहता ऑक्टोबरमधील पावसाचे प्रमाण वर्षागणिक बदलत असल्याचे दिसते. २०२० मध्ये सर्वाधिक ३१३.३ मिलिमीटर, तर २०२२ मध्ये ३०३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१९ मध्येही २३५ मिलिमीटर पाऊस झाला होता. दुसरीकडे, २०२३ मध्ये १८.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. तो या कालावधीतील आतापर्यंतचा नीचांकी पाऊस होता. मात्र, यंदा अवघ्या १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने मागील नीचांकी नोंदीचाही विक्रम मोडला आहे.

याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहिले. पावसाच्या अनुपस्थितीमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविण्यात आले. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.’’

ऑक्टोबरमधील पावसाची अकरा वर्षांची आकडेवारी

Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…

शिवाजीनगर वेधशाळा | पाऊस मिलिमीटरमध्ये

| वर्ष | पाऊस |
|
| २०१५ | ७६.७ |
| २०१६ | ८०.४ |
| २०१७ | १८०.९ |
| २०१८ | ३६.१ |
| २०१९ | २३५.० |
| २०२० | ३१३.३ |
| २०२१ | १४०.२ |
| २०२२ | ३०३.५ |
| २०२३ | १८.६ |
| २०२४ | ६१.२ |
| २०२५ | ६७.३ |
| २०२६ | १.७ |

यंदाचा ऑक्टोबरमधील पाऊस गेल्या अकरा वर्षांतील सर्वांत कमी.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यंदा ऑक्टोबर महिन्यात पुण्यात किती पाऊस झाला?

    Ans: ऑक्टोबर महिन्यात अवघा १.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

  • Que: कोणत्या वर्षी सर्वाधिक पाऊस झाला होता?

    Ans: २०२० मध्ये सर्वाधिक ३१३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

Web Title: Pune weather october rain record deficit lowest in last 11 years tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Pune Rain
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…
1

Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट
2

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट

देशातील 25 राज्यांना हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’; ओडिशा, आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा
3

देशातील 25 राज्यांना हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’; ओडिशा, आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.