
मोठी बातमी! निवडणूक असून देखील आसामचा SIR मध्ये समावेश नाही; ECI आयुक्त म्हणाले...
केंद्रीय निवडणूक आयोग 12 राज्यात राबवणार एसआयआर प्रक्रिया
आसाम राज्याचा यादीत समावेश नाही
सर्वात प्रथम बिहारमध्ये राबवण्यात आली एसआयआर प्रक्रिया
बिहारप्रमाणे देशातील १२राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे. अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने या 12 राज्यांच्या यादीत आसामचे नाव घेतलेले नाही. आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तरी देखील आसाम राज्याचे नाव एसआयआर यादीत नाव का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
बिहारप्रमाणे देशातील १२ राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. देशातील अंदमान-निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र पुढील वर्षी आसाममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तरी देखील याचा एसआयआरमध्ये समावेश नसण्यावर आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख द्यानेश कुमार म्हणाले, ‘आसाममध्ये नागरीकतेशी संबंधित असलेले नियम देशातील बाकी राज्यांपेक्षा वेगळे आहेत. यामुळे आसाममधील एसआयआर प्रक्रियेसाठी नंतर आदेश दिले आहेत. वेगळ्या तारखेपासून याची अमलबजावणी केली जाणार आहे.’
बिहारप्रमाणे १२ राज्यांमध्ये होणार SIR
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “छठनिमित्त, मी सर्वांना, विशेषतः बिहारच्या ७५ दशलक्ष मतदारांना सलाम करतो.” बिहारमधील SIR नंतर, सर्व ३६ राज्य निवडणूक आयुक्तांसोबत दोन बैठका घेण्यात आल्या, जिथे देशभरात सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) मधील अनुभवांवर चर्चा करण्यात आली.
ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले की, SIR चा दुसरा टप्पा आता निवडक १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केला जाईल. या मोहिमेचा उद्देश पात्र मतदारांना यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकणे हा आहे. सर्व राजकीय पक्षांकडून वेळोवेळी मतदार यादीतील त्रुटींबद्दल तक्रारी येत असूनही, १९५१ ते २००४ दरम्यान अशा प्रकारची पुनरावृत्ती आठ वेळा करण्यात आली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या राज्यांमध्ये विशेष सघन पुनरावृत्तीचे नियोजन आहे त्या राज्यांमधील मतदार याद्या आज रात्री १२ वाजता गोठवल्या जाणार आहेत.