Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission : निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही आचारसंहितेचे बंधन; निवडणूक आयोगाचे कडक निर्देश

Election Commission : आदर्श आचारसंहितेच्या काळात निवृत्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सरकारी सेवकांचे राजकीय निर्बंध लागू होणार. निवडणूक आयोगाने पाच राज्यांना कडक निर्देश दिले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 10, 2026 | 04:32 PM
Election Commission : निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही आचारसंहितेचे बंधन; निवडणूक आयोगाचे कडक निर्देश

Election Commission : निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही आचारसंहितेचे बंधन; निवडणूक आयोगाचे कडक निर्देश

Follow Us
Follow Us:
  • राजकीय प्रचारात सहभागी न होण्याचा सल्ला
  • निवृत्त अधिकाऱ्यांसाठीही नियम समान
  • निवडणूक अधिकाऱ्यांशी बैठका घेण्यास मनाई
 

निवडणुकीच्या काळात राजकीय तटस्थता राखण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission ) महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेले निर्बंध आता राज्य सरकारांकडून विविध पदांवर नियुक्त किंवा पुनर्नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही लागू असतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्य सचिवांसह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आयोगाने यासंदर्भात पत्र पाठवले आहे. या पत्रात आयोगाने ६ नोव्हेंबर १९८४ आणि ६ एप्रिल १९९१ रोजी जारी केलेल्या जुन्या निर्देशांचाही संदर्भ दिला आहे.

राजकीय प्रचारात सहभागी न होण्याचा सल्ला

निवडणूक आयोगाच्या यापूर्वीच्या निर्देशांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात किंवा राजकीय प्रचार-प्रसारात सहभागी होऊ नये. तसेच कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा गटाच्या फायद्यासाठी आपल्या नावाचा, अधिकृत पदाचा अथवा अधिकाराचा वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आदर्श आचारसंहितेचे नियम सरकारी निधीतून पूर्णतः किंवा अंशतः आर्थिक मदत मिळणाऱ्या संस्था, समित्या, महामंडळे आणि आयोगांनाही लागू होतात. त्याचप्रमाणे या संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही हे नियम पाळणे बंधनकारक आहे. संबंधित राज्यांमधील सरकारी सेवा आचरण नियमांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय घडामोडी आणि निवडणुकांमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे.

वंदे भारत स्लीपरमध्ये ‘तत्काळ कोटा’ नाही; भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

निवृत्त अधिकाऱ्यांसाठीही नियम समान

राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून विविध पदांवर नियुक्त अथवा पुनर्नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी आचारसंहितेच्या काळात राजकीय तटस्थतेबाबत स्वतंत्र नियम किंवा स्पष्ट मार्गदर्शक सूचना नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सरकारी सेवकांना लागू असलेले निर्बंध अशा निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Turkey Steel Plant Explosion: तुर्की हादरलं! स्टील कारखान्यात भीषण स्फोट, मृतांचा आकडा १६ वर

निवडणूक अधिकाऱ्यांशी बैठका घेण्यास मनाई

आचारसंहिता लागू असलेल्या मतदारसंघांतील किंवा जिल्ह्यांतील कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याला अधिकृत चर्चा किंवा बैठकीसाठी बोलावू नये, तसेच अशा अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा बैठक घेऊ नये, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बाब गांभीर्याने घेतली जाईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे. सर्व संबंधितांच्या निदर्शनास हे निर्देश आणून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: निवडणूक आयोगाने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?

    Ans: आदर्श आचारसंहितेच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेले राजकीय निर्बंध निवृत्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Que: हे निर्देश कोणत्या अधिकाऱ्यांना लागू असतील?

    Ans: राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून विविध पदांवर नियुक्त किंवा पुनर्नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे निर्देश लागू असतील.

  • Que: निवृत्त अधिकाऱ्यांना राजकीय प्रचारात सहभागी होता येणार आहे का?

    Ans: नाही. आचारसंहितेच्या काळात त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राजकीय प्रचार आणि पक्षपाती कृतींपासून दूर राहावे लागेल.

Web Title: Election commission model code conduct rules retired government officers rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Election Commission
  • Goa
  • Punjab

संबंधित बातम्या

गोव्याचा पालोलेम समुद्रकिनारा आशियात अव्वल! अर्धचंद्राकार खाडी, पांढरीशुभ्र वाळू, जागतिक स्तरावर सहावे स्थान
1

गोव्याचा पालोलेम समुद्रकिनारा आशियात अव्वल! अर्धचंद्राकार खाडी, पांढरीशुभ्र वाळू, जागतिक स्तरावर सहावे स्थान

तुमचंही नाव मतदारयादीतून वगळले असेल तर काळजी नको; नाव जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अखेरची संधी
2

तुमचंही नाव मतदारयादीतून वगळले असेल तर काळजी नको; नाव जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अखेरची संधी

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत बदल; आता बैठकीचे अजेंडे आणि इतिवृत्त केले जाणार प्रसिद्ध
3

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत बदल; आता बैठकीचे अजेंडे आणि इतिवृत्त केले जाणार प्रसिद्ध

Election Commission Announce SSR: सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त सुधारणा जाहीर
4

Election Commission Announce SSR: सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त सुधारणा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.