Election Commission on Rahul Gandhi allegation of vote fraud india
Election Commission on Rahul Gandhi allegation : नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदमधून पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला आहे. मागच्यावेळी त्यांनी बोगस मतदार मतदारयादीमध्ये घातले असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी मतदार यादीमधून मतदार वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी अल्पसंख्याक आणि दलित लोकांना मतदारयादीतून वगळे जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत सढळ पुरावे दिले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या मतदारयादीतील नव्या घोटाळ्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदार यादीतून नावे वगळली असल्याचे आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांचे नाव घेत गंभीर आरोप केले. तसेच या आरोपांवर उत्तर दिले नाही तर तुम्ही सरकारच्या वोट चोरीला समर्थन देत आहात असे आम्ही समजू, असे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. यानंतर निवडणूक आयोगाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. याबाबत कॉंग्रेसच्या पेजवरुन करण्यात आलेल्या लाईव्हचा फोटो शेअर करत अयोग्याचा शिक्का निवडणूक आयोगाने लावला आहे. त्याचबरोबर हे सर्व आरोप बिनवुडाचे असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. आयोगाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, खासदार राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.
❌Allegations made by Shri Rahul Gandhi are incorrect and baseless.#ECIFactCheck
✅Read in detail in the image attached 👇 https://t.co/mhuUtciMTF pic.twitter.com/n30Jn6AeCr
— Election Commission of India (@ECISVEEP) September 18, 2025
पुढे निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर फॅक्टचेक करत उत्तर दिले. निवडणूक आयोगाने सांगितले की, “खासदार राहुल गांधी यांनी गैरसमज केल्याप्रमाणे, कोणत्याही नागरिकाकडून ऑनलाइन कोणतेही मत हटवता येत नाही. २०२३ मध्ये, अलांड विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच एफआयआर दाखल केला. नोंदीनुसार, अलांड विधानसभा मतदारसंघ २०१८ मध्ये सुभद गुट्टेदार (भाजप) आणि बीआर पाटील (काँग्रेस) यांनी जिंकला होता,” अशा शब्दांत निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत मत चोरीचा आरोप केला. यावेळी त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावा केला. निवडणूक आयोग लाखो मतदारांना पद्धतशीरपणे लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे. वगळणे हे व्यक्तींद्वारे नाही तर केंद्रीकृत सॉफ्टवेअरद्वारे केले गेले आहे. 2023 च्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील आणंदमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने दलित आणि ओबीसी मतदारांचा समावेश होता. तसेच काँग्रेस समर्थक लोकांची मते निवडकपणे वगळली जात आहेत. हे वगळणे बाहेरील राज्यांमधील फोन नंबर वापरून केले जात आहे. कर्नाटक सीआयडीने निवडणूक आयोगाला वारंवार १८ पत्रे लिहिली आणि मतदारांच्या नावांची माहिती न देऊन अनेक प्रश्न विचारले, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून असे दिसून येते की निवडणूक आयोग मतदारांच्या नावांची माहिती न देऊन लोकशाहीच्या ” हत्यारांना” संरक्षण देत आहे, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल यांनी आरोप केला की कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मतदार वगळले जात आहेत. मतदारांची नावे वगळून मत चोरी करण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. मी ठोस पुराव्यांसह माझा मुद्दा मांडत आहे. देशातील दलित आणि ओबीसी त्यांचे लक्ष्य आहेत. मला माझा देश आणि संविधान आवडते आणि मी त्याचे रक्षण करेन.” असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त करत गंभीर आरोप केला.