Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Political News: बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव, पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल

कराडमधील उंब्रज येथे राजकीय वादातून बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण. जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून साखरवाडी परिसरात दोन गट भिडले. उंब्रज पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 09:14 PM
बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव

बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव

Follow Us
Follow Us:

 

  • बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण
  • उंब्रज परिसरात तणाव
  • पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल
उंब्रज : लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांचे पुतणे बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण झाल्याची घटना पाल जिल्हा परिषद मतदार संघातील जंगलवाडी ते साखरवाडी रस्त्याच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजनेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी निर्माण झाली होती. पोलिसांनी परस्पर विरोधी अदखलपात्र तक्रारी दाखल करून घेतल्या असून राजकीय कारणातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

याबाबत उंब्रज पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, जिल्हापरिषद निवडणूक काळात निर्माण झालेल्या राजकीय कारणावरून चोरे (ता. कराड) लगतच्या साखरवाडी परिसरात दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुंकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले

याबाबत एका तक्रारीत बाळासाहेब वसंतराव साळुंखे रा. चोरे ता. कराड यांनी नमूद केले आहे की, निवडणुकीच्या भेटीगाठी सुरू असताना या कारणावरून झालेल्या वादा दरम्यान समोरच्या गटातील व्यक्तींनी त्यांच्याशी शिवीगाळ केली तसेच दमदाटी केल्याचा प्रकार घडला. हाताने किरकोळ मारहाण केली. तर दुसऱ्या तक्रारीत विश्वासराव निवृत्ती काळभोर यांनी म्हटले आहे की, जिल्हापरिषद निवडणूक सुरू असून काही कारणाने राजकीय वादातून समोरच्या बाजूकडून त्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले तसेच शाब्दिक वाद झाला. यातून किरकोळ मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली. दोन्ही फिर्यादींच्या तक्रारी नोंदवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील कार्यवाही कायद्यानुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

Web Title: Balasaheb chorekar attacked political tension in umbraj karad police update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Karad
  • political news
  • Umbraj
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
1

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात
2

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात

अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप; चौकशीची मागणी
3

अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप; चौकशीची मागणी

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?
4

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.