Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EC Warn Trinamool Congress : निवडणूक आयोगाचा मतता दीदींना दणका; तृणमूल कॉंग्रेसला दिला अंतिम इशारा

EC Warn Trinamool Congress : पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने मारहाणीचे वक्तव्य केल्याने निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसला इशारा दिला आहे. निवडणूका या निर्भड आणि पारदर्शक होतील असे वक्तव्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 01:09 PM
election commission ultimatum to trinamool congress over physical assault speech in west bengal election 2026

election commission ultimatum to trinamool congress over physical assault speech in west bengal election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाचा तृणमूल कॉंग्रेसला इशारा
  • मारहाणाची भाषा प्रचार सभेतील भाषणांमध्ये वापरल्यामुळे तक्रार
  • भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर तृणमूल कॉंग्रेसला दणका
EC Warn Trinamool Congress : पश्चिम बंगाल : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामधील सर्वात जास्त चर्चा ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सुरु आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बंगालमध्ये सुरुंग लावण्यास भाजपला यश मिळणार का याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यासाठी भाजप विविध राजकीय डाव देखील आखत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) तृणमूल काँग्रेसला इशारा दिला आहे.

निवडणूक आयोगाने एक्स या सोशल मीडिया साईटवर ऑफिशियल अकाऊंटवरुन ममता बॅनर्जी यांचा पक्षाला अंतिम इशारा देण्यात आला आहे. भाजप नेत्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा इशारा दिला आहे. आयोगाने लिहिले आहे की, तृणमूल काँग्रेसला निवडणूक आयोगाचा स्पष्ट संदेश आहे की यावेळी पश्चिम बंगालमधील निवडणुका भीती, हिंसाचार, धमक्या, प्रलोभने मुक्त असतील तसेच कोणत्याही छापा, बूथ जॅमिंग आणि सोर्स जॅमिंगशिवाय, असे स्पष्टपणे निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेसला सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह

पश्चिम बंगाल भाजपने बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे (CEC) तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. रायना येथे आयोजित एका सभेत बॅनर्जी यांनी, पक्ष आणि त्याच्या कार्यकर्त्यांविरुद्ध हिंसेच्या उघड धमक्यांसह, अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

चुनाव आयोग की तृणमूल कांग्रेस को दो टूक पश्चिम बंगाल में इस बार चुनाव:
भय रहित,
हिंसा रहित,
धमकी रहित,
प्रलोभन रहित,
छापा रहित,
बूथ एवं सोर्स जामिंग रहित होकर ही रहेंगे
ECI’s Straight-talk to Trinamool Congress This time, the Elections in West Bengal would surely be :… pic.twitter.com/p5fM8Uu337 — Election Commission of India (@ECISVEEP) April 8, 2026

“सभेदरम्यान बॅनर्जी म्हणाल्या, ‘पहिल्या टप्प्यात जिथे कुठे मतदान होईल, अगदी उत्तरेकडील प्रदेशांपासून ते जंगलमहालपर्यंत—सर्वांनी मिळून भाजपचे डोके, मान, हात आणि पाय मोडून काढले पाहिजेत. आणि दुसऱ्या टप्प्यात—पूर्व बर्धमान, दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता येथे—आम्ही त्यांची मान आणि पाठीचा कणा मोडून काढू; त्यानंतर ‘बोलो हरी, हरी बोल’ (जे ‘राम नाम सत्य है’ च्या समतुल्य आहे) या जयघोषासह त्यांना निरोप देऊ आणि त्या बाहेरच्या लोकांना सरणावर चढवू,’ असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते.”

हे देखील वाचा : तर TMC खासदार टक्कल करणार..; डेरेक ओब्रायन यांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज

Web Title: Election commission ultimatum to trinamool congress over physical assault speech in west bengal election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Election Commission
  • Mamata Banerjee
  • Trinamool Congress

संबंधित बातम्या

पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर टांगती तलवार! निवडणुकीच्या तोंडावर 91 लाख लोकांची ओळख गेली पुसल्या
1

पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर टांगती तलवार! निवडणुकीच्या तोंडावर 91 लाख लोकांची ओळख गेली पुसल्या

बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..
3

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.